Bharti Singh : "देवाचे आभार की, मला मुलगी नाही", कॉमेडी क्वीन भारती सिंह असं का म्हणाली?

Bharti Singh Viral Statement : भारती सिंह सध्या तिच्या वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. तिने देवाचे एका खास गोष्टीसाठी आभार मानले आहे. भारती सिंह नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
Bharti Singh Viral Statement
Bharti Singhsaam tv
Published On
Summary

भारती सिंहने आपल्या कॉमेडीने जगाला हसवले आहे.

अलिकडेच भारती दुसऱ्यांदा आली झाली आहे.

भारतीला दुसऱ्यांदा मुलगा झाला. ज्याला प्रेमाने भारती 'काजू' बोलते.

कॉमेडी क्वीन भारती सिंह अलिकडेच दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. भारती सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे युट्यूब चॅनेल देखील आहे. ज्यात ती आपल्या आयुष्यातील घडामोडींचे अपडेट देते. बाळाच्या जन्मानंतर भारती सिंह पुन्हा कामावर परतली आहे. नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये ती बोलताना दिसली की, "देवाचे लाख लाख आभार की, मला मुलगी नाही..." याचे नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

भारती सिंहने गेल्यावर्षी 19 डिसेंबर 2025 गोंडस मुलाला जन्म दिला. भारती आणि हर्षने अनेक वेळा 'आम्हाला दुसरी मुलगी व्हावी' अशी इच्छा व्यक्त केली होती. पण आता व्लॉगमध्ये भारती सिंह देवाचे आभार मानताना दिसत आहे. तसेच ती म्हणाली की, "मुलं आई-वडिलांना घराबाहेर काढण्याची भाषा करतात, हे मला अजिबात आवडत नाही. जे चुकीचे आहे..."

भारती सिंह म्हणते की, "देवाचे लाख लाख आभार आहेत, आम्हाला मुलगी नाही. आपण मुलीला मोठे करतो. तिचे चांगले संगोपन करतो. पण एक दिवशी तिचे लग्न करून तिला सासरी पाठवतो. एकदा गोला मला गमतीत म्हणाला, मी निघून जाईन, तेव्हा मला इतकं वाईट वाटले. तेव्हा मुलीला स्वतः पासून दूर करणे मी सहनच करू शकले नसते. ज्यांना मुलगी आहे, ते आई-वडील खरंच खूप धन्य आहेत. जे काळजावर दगड ठेवून मुलीला शिकवतात. मोठे करतात आणि लग्न करून सासरी पाठवतात..."

2017ला भारती सिंहने लेखक हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2022 मध्ये तिने लक्ष सिंग लिंबाचियाला जन्म दिला. लक्षचे टोपणनाव गोला आहे. तर दुसऱ्या मुलाचे टोपणनाव नाव 'काजू' ठेवले आहे. भारती सिंह आता पुन्हा एकदा 'लाफ्टर शेफ्स'च्या सेटवर आली आहे.

Bharti Singh Viral Statement
Bigg Boss Marathi 6 : पाया पडली, हात जोडले; पॉवर KEY साठी करणसमोर रुचिता ढसाढसा रडली, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com