Allu Arjun SAAM TV
मनोरंजन बातम्या

Allu Arjun : 'पुष्पा'साठी रईसचा दाखला, वकिलांनी कोर्टात उघडली शाहरुख खानची जुनी केस

Allu Arjun Case Connection With Shah Rukh Khan : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनला जामीन मिळवण्यासाठी शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटाच्या प्रमोशनला घडलेल्या घटनेचा वकिलांनी दाखला दिला. नेमकं काय घडले जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनची चर्चा पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू होतो. या प्रकरणी अल्लू अर्जुनला काल (13 डिसेंबर)ला पोलिसांनी अटक केली. मात्र आता अल्लू अर्जुनला चार आठवड्यांसाठी जामीन मंजूर झाला आहे.

'पुष्पा 2' अभिनेता अल्लू अर्जुनला (Allu Arjun) निर्दोष सिद्ध करण्यासाठी वकिलांनी खूप प्रयत्न केले. वकिलांनी हायकोर्टामध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान शाहरुख खानची जुनी केसचा दाखला दिला. कनिष्ठ न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. मात्र रात्री त्याला जामीन मंजूर करण्यात आला. हायकोर्टाकडून हा जामीन मंजूर झाला आहे.

अल्लू अर्जुनचे वकील निरंजन रेड्डी आणि अशोक रेड्डी यांनी सांगितले की, "2017 मध्ये 'रईस' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वडोदरा स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) एका चाहत्याचा मृत्यू झाला होता, मात्र त्याला दिलासा देण्यात आला होता. " त्यामुळे याच्या आधारावर अल्लू अर्जुनला देखील दिलासा देण्यात यावा याची मागणी वकिलांनी केली. यावर निर्णय देत तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला.

नेमकं प्रकरण काय?

हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबरला 'पुष्पा 2' चित्रपटाचा शो होता. तेव्हा साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन तेथे आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात थिएटर बाहेर चाहत्यांनी गर्दी झाली होती. तेथे झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच ८ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणामुळे अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. मात्र आता त्याला जामीन मिळाला आहे.

'पुष्पा 2' ऑफिस कलेक्शन

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' 9 दिवसात बॉक्स ऑफिसवर 762.6 कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे. तर जगभरात 'पुष्पा 2' चित्रपटाने जगभरात 1060 कोटी रुपये कमावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT