Pushpa 2 Update SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 OTT Release Date : 'पुष्पा २' पाहायला मिळणार 'या' ओटीटीवर ; २७५ कोटींना विकले घेतले हक्क !

Pushpa 2 OTT Release Date : 'पुष्पा २' ला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने १४ दिवसांत ९०० हून अधिक कोटींची कमाई करत अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pushpa 2 OTT Release Date : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट यशस्वीपणे चालू आहे. तरीही प्रेक्षक हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार हे वारंवार सोशल मीडियावर विचारत आहेत.

तुम्हाला 'पुष्पा २' कुठे पाहता येईल ?

चाहते चित्रपट OTT वर 'पुष्पा २' प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. 'पुष्पा २' हा चित्रपट 'नेटफ्लिक्स' या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. एका वृत्तानुसार, नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे हक्क २७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. OTT वर चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी जोरदार आहे. मात्र, यासाठी चाहत्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.

तुम्ही नेटफ्लिक्स वर 'पुष्पा २' कधी पाहू शकाल?

चित्रपटाच्या OTT रिलीजबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण तुम्ही ठराविक रिलीज पॅटर्न फॉलो केल्यास, हा चित्रपट थिएटर रिलीज झाल्यानंतर ६ ते ८ आठवड्यांनंतर OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो. वृत्तांनुसार, चित्रपट ऑनलाइन पाहण्यासाठी चाहत्यांना फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

हा चित्रपट OTT वर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत पाहता येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून चित्रपटात अल्लू अर्जुन पुष्पा राजच्या भूमिकेत आहे. तर, रश्मिका मंदान्ना ही श्रीवल्लीच्या भूमिकेत आहे. तसेच, अभिनेता फहाद फासिलने या चित्रपटातील आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले. 'पुष्पा २' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने १६४ कोटींची ओपनिंग केली होती.तर, या चित्रपटाने १४ दिवसांत ९६२.०४ कोटींचा गल्ला केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT