Prabhas Film Postponed : प्रभासचा ४०० कोटींचा चित्रपट अडकला; रीलीज डेट पुढे ढकलली, कारण काय?

Prabhas Film Postponed : प्रभासचा चित्रपट 'द राजा साब' हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची बातमी समोर येत आहे.
Prabhas movie raja saab
Prabhas movie raja saabGoogle
Published On

Prabhas Film Postponed : पॅन इंडिया स्टार बाहुबली प्रभासचा बिग बजेट चित्रपट 'कल्की 2898 एडी' यावर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी चित्रपटाचे VFX प्रेक्षकांना आवडले. काही काळापूर्वी बातमी आली होती की प्रभास 'द राजा साब' नावाचा आणखी एक बिग बजेट चित्रपट २०२५मध्ये प्रदर्शित होणार आहे. पॅन इंडिया प्रदर्शनासाठी तयार होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मारुती यांनी केले आहेत. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, पण प्रभासच्या 'द राजा साब' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

माहितीनुसार, 'द राजा साब'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यासोबतच येत्या आठवड्यात या चित्रपटाची नवीन रिलीज डेटही जाहीर केली जाऊ शकते. नुकतेच प्रभास त्याच्या आगामी 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर जखमी झाल्याचेही समोर आले आहे. मात्र, ही दुखापत किरकोळ की गंभीर याबाबत अधिकृत खुलासा झालेला नाही. 'द राजा साब' बद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाची रिलीज डेट १० एप्रिल २०२५ होती मात्र अद्याप चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले नसल्याने निर्माते लवकरच नवीन रिलीजची तारीख जाहीर करणार आहेत. 'कल्की 2898 एडी' नंतर प्रभासला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा असलेले त्याचे चाहते दु:खी झाले आहेत.

Prabhas movie raja saab
Ranveer - Deepika : दीपिका-रणवीरचा तो फोटो होतोय व्हायरल; काय खरं, काय खोटं?

हा चित्रपट देखील १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार...

दरम्यान, तेलगू अभिनेता सिद्धू जोनानागडा याच्या 'जॅक' हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार असल्याची निर्मात्यांनी घोषणा केली आहे. जर 'द राजा साब' देखील त्याच तारखेला प्रदर्शित झाला असता, तर बोम्मारिल्लू बास्करचा 'जॅक' आणि प्रभासचा 'द राजा साब' यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला असता आणि त्याचा परिणाम कलेक्शनवरही झाला असता.

Prabhas movie raja saab
Salman Khan : सलमान खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सलमानच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार सिकंदरचा टीझर

प्रभासचा ४०० कोटींचा चित्रपट 'द राजा साब'

प्रभासच्या 'द राजा साब'चे बजेट जवळपास ४०० कोटी रुपये आहे. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते, मात्र आता ही प्रतीक्षा आणखी लांबणार आहे.द राजा साबमध्ये प्रभास शिवाय मालविका मोहनन, रिद्धी कुमार आणि निधी अग्रवाल यांसारखे स्टार्स देखील दिसणार आहेत. या चित्रपटात बोललीवूडचा अभिनेता संजय दत्तही महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com