मनोरंजन बातम्या

Alia Bhatt Get Trolled: PM मोदींच्या भाषणादरम्यान आलिया भट गाढ झोपली, VIDEO व्हायरल होताच अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Pooja Dange

Alia Bhatt Fall Asleep During PM Modi Speech:

शनिवारी म्हणजे १४ ऑक्टोबरला मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर येथे १४१ व्या आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक कमिटीचा उद्‌घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता.

आयओसीच्या या कार्यक्रमाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा देखील या कार्यक्रमाला हजर होते. पीएम मोदींनी या सोहळ्याचे उद्‌घाटन केले.

आयओसी या सोहळ्याला जाण्यापूर्वी कलाकारांनी पापाराझींसमोर पोज देखील दिल्या. कलाकारांचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. तसेच आता या कार्यक्रमातील इंसाईड फोटो आणि व्हिडीओ देखील खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये आलिया भट, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये आलिया भट झोपली असल्याचे दिसत आहे. तर रणबीर कपूर देखील फोनमध्ये बिजी असल्याचे दिसत आहे. यामुळे दोघेही ट्रोल होत आहेत.

दुसरीकडे आलिया भट, रणबीर कपूर, शाहरुख खान, दीपिका पदुकोण यांचा एक व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण पुढच्या रांगेत बसले आहेत. तर आलिया आणि रणबीर मागच्या रांगेत बसले आहे. सगळेजण समोर बघत आहेत. तर आलिया वर छताकडे बघत आहे.

चारही सेलेब्रिटी खूप कंटाळलेले दिसत आहेत. नेटकऱ्यांनी या फोटो आणि व्हिडीओवर भरपूर कमेंट केल्या आहेत. 'आलिया वर काय बघतेय?', 'रणबीर कपूरला दीपिकाशी ब्रेकअप केल्याचं पश्चाताप होत आहे.' 'आलिया झोपेत आहे.' 'शाहरुख पण अल्मोस्ट झोपला आहे', 'केमिस्ट्री लेक्चरला विदयार्थ्यांची अशी अवस्था असते' अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सेलिब्रिटी लूक

आलिया भटने यावेळी निळ्या रंगाचं वेल्वेटचा ड्रेस घातला होता. त्यावर सुंदर एम्ब्रॉयडरी होती. रणबीर कपूरने आलियाशी ट्विनिंग केले होते. त्याने देखील निळ्या रंगाचे इंडो-वेस्टर्न आऊटफिट घातले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT