Alia Bhatt, Ranbir Kapoor win big at Dadasaheb Phalke International Film Festival Awards Saam TV
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor Award: बॉलिवूडचं क्युट कपल ठरलं सर्वोकृष्ट अभिनेता-अभिनेत्री

आलिया-रणबीर दोघांनाही दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.

Pooja Dange

Alia Bhatt-Ranbir Kapoor Best Actor-Actress Awards: मुंबईत दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सव पार पडला आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. या सोहळ्यात अनेक कलाकारांना गौरविण्यात आले. आलिया-रणबीर या बॉलिवूडच्या लाडक्या जोडीलाही गौरविण्यात आले आहे.

आलिया भट्टने सध्या चित्रपटातून ब्रेक घेतला आहे आणि मातृत्वाचा आनंद घेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याला आलिया भट्ट उपस्थित राहिली होती. पांढऱ्या एम्ब्रॉयडरी साडीत आलिया सुंदर दिसत होती. या सोहळ्यातील तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आलिया भट्टने दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याला एकटीनेच हजेरी लावली होती. रणबीर त्याच्या कामामध्ये व्यस्त असल्याने त्याला या सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. तर पती-पत्नी दोघांनाही दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.

रणबीरला 2022 मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट ब्रह्मास्त्रमधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर गंगूबाई काठियावाडी या ब्लॉकबस्टर चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयासाठी आलिया भट्टला यावर्षी दादासाहेब फाळके पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आलियाने तिच्या रणबीरच्यावतीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची पुरस्कार स्वीकारला.

सध्या रणबीर 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, जो या वर्षी मार्चमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. लव रंजनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. रणबीर कपूर पुढे अॅनिमल चित्रपटामध्ये दिसणार आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट सध्या अंतिम टप्प्यात आहे.

आलिया भट्ट विश्रांतीनंतर, तिच्या बहुप्रतिक्षित रोमँटिक चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे शूटिंग पुन्हा सुरू करेल अशी अपेक्षा आहे. करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहे. त्यानंतर आलिया, कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्यासह आगामी फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा'च्या शूटिंगला सुरुवात करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT