Alia Bhatt Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kolkata Doctor Case : कोलकाता अत्याचार प्रकरणावर भडकली आलिया भट्ट, आयुष्यमान खुरानाचाही संताप, पाहा कोण काय म्हणाले?

Kolkata doctor rape-murder case: कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरसोबत अत्याचार आणि खून प्रकरणावर आता कलाकारांकडूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

Kolkata doctor rape-murder case: कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरसोबत अत्याचार आणि खून प्रकरणावर आता कलाकारांकडूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, आयुष्यमान खुराना, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रासह अनेकांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटलेय, की महिला कुठेच सुरक्षित नाहीत. तर दुसरीकडे आयुष्यमान खुरानाने यावर कविता म्हटली आहे, ती व्हायरल होत आहे. इतकेच काय आलिया भट्टने नॅशनल क्राइम ब्युरो २०२२ चा रिपोर्टही शेअर केलाय.

कोलकाता येथील आरजी मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरासोबत एका नराधमाने अत्याचार केला. त्यानंतर तिचा क्रूरपणे खून केला. याप्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीच. लोकांमधील वाढता संताप पाहून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलेय. याप्रकरणी अनेकजण जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत. यामध्ये आता विविध कलाकारांचाही समावेश आहे. आलिया भट्ट हिने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला. यामध्ये आलिया नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो रिपोर्ट 2022 चा डेटाही शेअर केला आहे.

त्याशिवाय अभिनेता आयुष्यमान खुराना ह्याने कविता म्हणत आपली नाराजी जाहीर केली.

परिणीती चोप्रा हिनेही याप्रकरणावर संताप व्यक्त करत पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने म्हटले होते की, "जर तुम्हाला हे सगळं वाचणे इतके अवघड असेल तर तिच्यासाठी ते किती कठीण गेले असेल याची कल्पना करा." सोनाक्षी सिन्हा हिनेही एक व्हिडिओ पोस्ट करत न्यायाची मागणी केली होती. सोनाक्षीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, कोलकाता बलात्कार प्रकरणी आवाज उठवा आणि न्यायाची मागणी करा.

1. भारतात 30 टक्के डॉक्टर आणि 80 टक्के नर्सिंग स्टाफ महिला आहेत.

2. 2022 नंतर महिलांवरील गुन्ह्यांमध्ये 4 टक्के आणि बलात्काराच्या घटनांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

3. भारतात 2022 मध्ये एका दिवसात 90 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

महिलांबाबत असे प्रकार सातत्याने घडत आहेत. पण गोष्टी योग्य होतील अशी आशा नाही. आम्ही तिला वाचवू शकलो नाही पण असे काही पुन्हा घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो, असे व्हिडिओत म्हटलेय.

दुसरीकडे आयुष्यमान खुरानाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यामध्ये त्याने कोलकाता प्रकरणावर संताप व्यक्त केला. कवितेच्या माध्यमातून त्याने आपला राग व्यक्त केला आहे.

आयुष्यमान खुरानाची कविता, जशीच्या तशी....

” मैं भी बिना कुंडी लगाकर सोती, काश मैं भी लड़का होती. झल्ली बनकर दौड़ती उड़ती सारी रात दोस्तों के साथ फिरती, काश मैं भी लड़की होती. कहते सुना है सबको कि लड़की को पढ़ाओ लिखाओ सशक्त बनाओ. और जब पढ़ लिखकर डॉक्टर बनती तो मेरी मां न खोती उसकी आंखों का मोती, काश मैं भी लड़का होती. 36 घंटे का कार्य दुश्वार हुआ, बहिष्कार हुआ, बलात्कार हुआ, पुरुष के वहशीपन से साक्षात्कार हुआ. काश उन पुरुषों में भी थोड़े से स्त्री पन की कोमलता होती, काश मैं ही लड़का होती. कहते हैं CCTV नहीं था, होता भी तो क्या होता. एक पुरुष सुरक्षाकर्मी जो उस पर नजर रखता, उसकी नजर भी कितनी पाक होती? काश में एक लड़का होती. अगर मैं एक लड़का होती शायद आज मैं भी जिंदा होती. ”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

SCROLL FOR NEXT