Akshaye Khanna Dance Saam tv
मनोरंजन बातम्या

Akshaye Khanna Dance: अक्षय खन्नानं २० वर्षांपूर्वीच्या चित्रपटातही केली होती 'धुरंधर'मधील FA9LA ची डान्स स्टेप, व्हिडिओ होतोय व्हायरल

Akshaye Khanna Dance: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याचा नवीन चित्रपट ‘धुरंधर’ मधील डान्स सीन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पण, अक्षयने या पूर्वी देखील ही स्टेप केली होती.

Shruti Vilas Kadam

Akshaye Khanna Dance: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याचा नवीन चित्रपट ‘धुरंधर’ मधील डान्स सीन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, यामुळे चाहत्यांना त्याच्या जुन्या ‘हलचल’ चित्रपटातील स्टाइलची आठवण येत आहे. या धुरंधरमधील सीनमध्ये अक्षय खन्ना रेहमान डकैत या पात्राच्या प्रवेशाच्या वेळी FA9La या गाण्यावर डान्स करतो, जो बहरीनी रॅप ट्रॅक आहे आणि सोशल प्लेटफॉर्म्सवर ट्रेंड करत आहे.

व्हायरल डान्स क्लिपमध्ये प्रेक्षक आणि नेटिझन अक्षयच्या सहज आणि नैसर्गिक नृत्यशैलीचे कौतुक करत आहेत. यासह चाहत्यांना त्याच्या जुन्या ‘हलचल’ चित्रपटातील रफता रफता या गाण्यावर केलेल्या डान्स स्टेप्सची आठवण येते असून या दोन्ही गाण्यातील स्टेपची तुलना करण्यात येत आहे. सोशल मीडियावर सेम डान्स डिफर्नट ऑरा” अशी कमेंट नेटकरी करत आहेत.

या व्हायरल ड्रेंडमुळे अक्षय खन्नाच्या चाहत्यांनी त्याचे इतर जुने डान्स व्हिडिओजही शोधायला सुरुवात केली आहे आणि काहींनी त्याचे वडिल विनोद खन्ना यांच्या एका डान्य व्हिडीओशी त्याच्या डान्ससोबत तुलना केली आहे, यामुळे सामाजिक माध्यमांवर नवदीच्या कलाकारांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नॉस्टाल्जिक चर्चाही तापून जात आहेत.

धुरंधर हा आदित्य धर दिग्दर्शित स्पाय-एक्शन थ्रिलर आहे. ज्यात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि संजय दत्त अशा अनेक नामांकित कलाकारांचा समावेश आहे. चित्रपटातील या सीनमुळे अक्षय खन्नाची कामाची सर्वाधिक चर्चा भारतभर होत आहे. या व्हायरल घटनेमुळे ‘धुरंधर’ आणि अक्षय खन्ना यांचा लोकप्रियता वाढली असून हा सीन पण चित्रपटातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक ठरला आहे.

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : अजित पवारांच्या पार्थिवावर काहीच वेळात होणार अंत्यसंस्कार

Gold Rate Today : सोन्याच्या दरवाढीचा स्फोट, एका दिवसात प्रति तोळा ११,७७० रुपयांची वाढ; वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर

Pilot Salary: विमान चालवणाऱ्या पायलटचा पगार किती असतो? जाणून घ्या

Baby Clothes Tips : लहान मुलांच्या कपड्यांना येणारा तेलाचा वास कसा दूर करावा? जाणून घ्या टिप्स

Tirgrahi Yog: 200 वर्षांनंतर या राशींवर पडणार पैशांचा पाऊस; त्रिग्रही राजयोगाने होणार मालामाल

SCROLL FOR NEXT