Akshay Kumar OMG 2  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar’s Oh My God 2 Review : 'OMG 2' चित्रपटाच्या निर्मात्यांनी उचललं मोठं पाऊल, काय आहे नेमकं कारण?

Oh My God 2 Controversy : सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडे चित्रपट पुनरावलोकनासाठी पाठविण्यात आला आहे.

Pooja Dange

Oh My God 2 Sent To Censor Board Review : अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांचा ओ माय गॉड 2 हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे. अमित राय दिग्दर्शित आणि लिखित हा चित्रपट अक्षय कुमार आणि परेश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ओह माय गॉडचा सीक्वल आहे.

या चित्रपटाचा पहिला भाग २०१२ मध्ये प्रदर्शित झळा होता. चित्रपटाच्या फर्स्ट-लूक पोस्टरमुले प्रेक्षकांच्या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. संपूर्ण टीमने अलीकडेच सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर केला. त्यामुळे प्रेक्षक आता चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

CBFC ओ माय गॉड 2 चे पुनरावलोकन करणार

चित्रपटासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना ओ माय गॉड 2 च्या निर्मात्यांनी वाद टाळण्यासाठी एक सक्रिय पाऊल उचलले आहे. एका अहवालातून हे सांगण्यात आले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडे चित्रपट पुनरावलोकनासाठी पाठविण्यात आला आहे. एका विशिष्ट सीनमुळे निर्मात्यांनी हे पाऊल उचललं आहे.

चित्रपटातील एका सीनमध्ये अक्षय कुमार रेल्वेच्या पाण्याने शंकराचा रुद्राभिषेक करत आहे, ज्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे आणि चिंता निर्माण केली आहे. इंडिया टुडेच्या अहवालात नमूद केलेल्या अहवालानुसार, “सीबीएफसी आदिपुरुषला त्याच्या संवादांवर आलेल्या प्रतिक्रियांची पुनरावृत्ती करू इच्छित नाही” अक्षय कुमार-स्टार असलेल्या ओह माय गॉड 2 चित्रपटातील संवाद आणि दृश्यांवरबद्दल बोर्डाच्या समिती चित्रपट पाहिल्यानंतर निर्णय घेईल, असे सांगण्यात आले आहे.

ओह माय गॉड 2 चा टीझर

OMG 2 चा टीझर अधिकृतपणे निर्मात्यांनी 11 जुलै रोजी रिलीज केला. यात अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या पात्रांची झलक दिसली आहे. अक्षय भगवान शंकराच्या भूमिकेत दिसत आहे, तर पंकज भगवान शंकराच्या भक्त कांती शरण मुद्गलची भूमिका साकारताना दिसत आहे.

या चित्रपटात रामायण फेम अभिनेते अरुण गोविल देखील आहेत. चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. याच दिवशी सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा गदर 2 देखील प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT