Akshay Kumar yandex
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar: बॉलिवूडमध्ये 'हा' मोठा बदल घडवून आणणं गरजेचं; त्या मुद्द्यावर स्पष्टचं बोलला अक्षय कुमार

Akshay Kumar: अक्षय कुमारने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान बॉलिवूडमध्ये तो कोणते बदल घडवून आणू इच्छित आहे हे सांगितले.

Shruti Vilas Kadam

Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या 'स्काय फोर्स' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटात त्याच्यासोबत वीर पहाडिया देखील आहे. अलिकडेच एका मुलाखतीत अक्षयला विचारण्यात आले की, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये त्याला कोणते बदल करायचे आहेत, तेव्हा तो म्हणाला की, बॉलिवूड इंडस्ट्री एक कुटुंब असूनही, त्यात एकतेचा अभाव आहे.

अक्षयला बॉलिवूडमध्ये काय बदल करायला आवडेल?

एका IMDb चॅट शोमध्ये वीर पहाडियाने अक्षय कुमारला विचारले होते, "चित्रपट किंवा बॉलिवूडमध्ये असे काही आहे का जे तुम्हाला बदलायचे आहे?" यावर अक्षय कुमारने लगेच उत्तर दिले, "जर मला आमच्या इंडस्ट्रीमध्ये काही बदल करण्याची संधी मिळाली तर मी आमच्या इंडस्ट्रीत अधिक एकता आणू इच्छितो." तो पुढे म्हणाला, आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. आम्ही एकात्मने काम करतो. पण हळू हळू सगळे एकमेकांपासून दूर होत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांच्या यशाचा आनंदही साजरा केला पाहिजे. याचा आपल्यावर आणि इतरांवरही चांगला परिणाम होईल.

अजय देवगणनेही हे सांगितले

अजय देवगणनेही एका मुलाखतीदरम्यान अक्षय कुमारसारखेच काहीसे उत्तर दिले होते तो म्हणाला, मी सहमत आहे की बॉलिवूड इंडस्ट्री एकता नाही. यावर कुमार म्हणाला, दाक्षिणात्य चित्रपटसुटीचे मला कौतुक आहे कारण ते ज्या पद्धतीने एकत्र काम करतात त्याचे मला फार वाखाड्ण्या जोगे वाटते.

अक्षय कुमारच्या कामाबद्दल

अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, स्काय फोर्स व्यतिरिक्त, तो 'शंकरा', 'जॉली एलएलबी ३' आणि 'हाऊसफुल ५' सारख्या चित्रपटांमध्ये यावर्षी दिसणार आहे. अभिनेत्याचे चाहते त्याच्या या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT