Akshay Kumar Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Birthday: '१५० हून अधिक चित्रपट आणि...', वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमारची खास पोस्ट, मानले प्रेक्षकांचे आभार

Akshay Kumar Birthday Post: आज अभिनेता अक्षय कुमारचा ५८ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने अभिनेत्याने एक खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

Shruti Vilas Kadam

Akshay Kumar Birthday Post: बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा आज ५८ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने अक्षयला त्याच्या चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता अभिनेताने स्वतः त्याच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. एक खास फोटो शेअर करत अक्षयने त्याच्या चित्रपट आणि कारकिर्दीचा उल्लेख करत चाहत्यांचे आभार मानले.

अक्षयने खास पोस्ट लिहिली

अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे, यामध्ये अक्षयचा एक फोटो आहे आणि त्याच्या मागे त्याच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिकांचे फोटो कोलाज केलेले आहेत. यासोबतच अक्षयने कॅप्शनमध्ये एक लांबलचक नोटही लिहिली आहे. अक्षयने पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, '५८ वर्षे कठोर परिश्रम, या इंडस्ट्रीमध्ये ३४ वर्षे, १५० हून अधिक चित्रपट आणि बरेच काही. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या, मला संधी देणाऱ्या मला प्रोड्यूस आणि डायरेक्ट तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्यांचे आभार हा प्रवास जितका माझा आहे तितकाच तुमचाही आहे.

तुमच्या सर्व चांगल्या कृतींसाठी, पाठिंब्यासाठी आणि प्रोत्साहनदायक शब्दांसाठी मी तुमचे कायमचे आभार मानण्यासाठी येथे आहे. तुमच्याशिवाय मी काहीच नाही, माझा वाढदिवसानिमित्त माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. तुम्हा सर्वांचे आभार आणि सर्वांसाठी प्रेम आणि प्रार्थना. तुमचा अक्षय. ' शेवटी, अक्षयने जय महाकाल असे लिहून त्याची पोस्ट पूर्ण केली आहे.

राहुल नंदा यांनी खास चित्र काढल्याबद्दल मानले आभार

त्याच्या पोस्टमध्ये अक्षयने राहुल नंदा यांचेही खास चित्र काढल्याबद्दल आभार मानले. त्याने पुढे लिहिले, 'जगातील माझ्या आवडत्या लोकांसाठी, माझ्या चाहत्यांसाठी माझ्या आयुष्यातील काम टिपल्याबद्दल राहुल नंदा यांचे खूप खूप आभार.' अक्षय कुमारची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी ३' चित्रपट

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अक्षय कुमार लवकरच त्याच्या आगामी 'जॉली एलएलबी ३' चित्रपटात दिसणार आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित या चित्रपटात अर्शद वारसी, हुमा कुरेशी आणि सौरभ शुक्ला देखील प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. कोर्टरूम ड्रामा फ्रँचायझीचा हा तिसरा भाग १९ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT