Ram Setu Thank God Release Date
Ram Setu Thank God Release Date Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar: अक्षयचा रामसेतू आणि सिद्धार्थचा थँक गॉड एकच दिवशी रिलीज होणार, अक्षय कुमार म्हणतो...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Akshay Kumar Upcoming Movie: चित्रपट आणि सण यांचे एक वेगळे समीकरण आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांचे सण वाटून घेतल्याचं अनेकदा दिसून येत. कारण त्या त्या सणाला त्यांचे चित्रपट प्रदर्शित होत असतात. परंतु यंदा चित्र वेगळं आहे. अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा या दोघांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. अक्षय कुमारचा 'राम सेतू' आणि सिद्धार्थ मल्होत्रा याचा 'थँक गॉड' हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यावर अक्षय कुमार याने भाष्य केलं आहे.

अक्षय कुमारचा 'राम सेतू' आणि सिद्धार्थ मल्होत्रा याचा 'थँक गॉड' बॉक्स ऑफिसवर एकत्र धडकणार आहेत. एका चित्रपटात अॅक्शन पाहायला मिळणार आहे तर दुसऱ्या चित्रपटात कॉमेडी. त्यामुळे या चित्रपटांचा आमना-सामना होणार आहे. परंतु अक्षय कुमारने यावर आपण मत व्यक्त केले आहे. त्याने असा आग्रह केला आहे की, एकाच दिवशी प्रदर्शित होणार्‍या दोन चित्रपटांचा उल्लेख "क्लॅश" म्हणून करू नये.

अक्षयचा अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर 'राम सेतू' आणि इंद्र कुमार दिग्दर्शित कॉमेडी चित्रपट 'थँक गॉड', 25 ऑक्टोबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने सांगितले आहे की, “हा कोणताही सामना नाही. त्याचा तसा उल्लेख करू नका. एकाच दिवशी रिलीज होणारे ते दोन चित्रपट आहेत, पण कथा भिन्न आहेत. असे भूतकाळात घडले आहे आणि भविष्यातही घडेल. प्रेक्षक त्यांना आवडणारा चित्रपट निवडतील आणि तो पाहणं पसंत करतील. आमच्या चाहत्यांना मित्र आणि कुटुंबियांसोबत चित्रपटांचा आनंद लुटता यावा हा मुख्य उद्देश आहे”. (Akshay Kumar)

अक्षयच्या म्हणण्यानुसार, 'राम सेतू', ज्यामध्ये त्याला पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते, देशाचा इतिहास आणि संस्कृती लक्षात घेऊन सर्वांच्या भावनांचा आदर करून बनवला गेला आहे. या चित्रपटात नुशरत भरुच्चा, जॅकलिन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत आणि तेलगू अभिनेता सत्यदेव या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणार आहे.

“'राम सेतू' भारतीय इतिहास आणि संस्कृतीत अतिशय अभिमानाने रुजलेला आहे. टीमने सत्य काय आहे हे दाखवण्यासाठी आणि अनेक अज्ञात तथ्ये समोर आणण्यासाठी सखोल संशोधन केले आहे. आम्ही फक्त भावनांचाच विचार केला असे नाही, परंतु मी तुम्हाला खात्री देतो की श्री राम आणि राम सेतू यांच्याशी संबंधित मूल्ये आणि श्रद्धा अनन्यपणे जपल्या आम्ही जपल्या आहेत,” असेही अक्षय म्हणाला.

अभिषेक शर्मा दिग्दर्शित, बच्चन पांडे, पृथ्वीराज आणि रक्षाबंधन या चित्रपटांनंतर 'राम सेतू' हा अक्षय कुमारचा यावर्षीचा चौथा चित्रपट आहे. अक्षयचा कटपुटली देखील ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT