Akash Thosar Video  Saam TV
मनोरंजन बातम्या

Akash Thosar Video : काय झाडी, काय डोंगर अन् काय तो धबधबा; आकाश ठोसरने भरपावसात घेतला गरमागरम भजीचा आस्वाद

Akash Thosar : आकाश ठोसरने काही दिवसांपूर्वी आकाशने गिर्यारोहन आणि वॉटरफॉल रॅपलिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.

Pooja Dange

Akash Thosar Share Video : सैराट चित्रपटातून आपल्याला भेटीला आलेला अभिनेता आकाश ठोसर. आकाश ठोसरचा एक चाहता वर्ग आहे. त्याच्यावर आणि त्याच्या पोस्ट नेटकरी प्रेमाचा वर्षाव करत असतात.

सध्या आकाश सह्याद्रीच्या कुशीत पावसाचा आनंद घेत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ आकाश शेअर करत असतो. आकाशच असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आकाश ठोसरने काही दिवसांपूर्वी आकाशने गिर्यारोहन आणि वॉटरफॉल रॅपलिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. तर आता आकाशने सह्याद्रीच्या कुशीत मस्त भाजीचा आस्वाद घेतला आहे.

आकाशने गिर्यारोहण करताना वापरण्यात येणाऱ्या गोष्टींचा वापर करून डोंगरदऱ्यांच्या सानिध्यात पार्टेबल गॅसचा वापर करून त्याने बटाट्याची भजी बनवली आहे. बटाटा धुण्यापासून ते अगदी भजी तळण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आकाशने तिथे केल्या. त्याच्या मदतीला तिथे काहीजण होते.

थंड वातावरणात गरमागरम भजी खान म्हणजे सुख असत. आकाशच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत आहे.

आकाशच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. सुंदर आयुष्यातील खरी मजा, बिर्याणीवरून डायरेक्ट बटाटा भजी अशा कमेंट नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्टवर केल्या आहेत.

आकाश घर बंदूक बिर्याणी या चित्रपटामध्ये दिसला होता. तर 'बाल शिवाजी' या आगामी चित्रपटामध्ये आकाश छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात

Success Story: शाळेसाठी दररोज ६ किमी पायपीट; शेतातही केले काम; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

Saturday Horoscope: पाच राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; होणार धन वर्षाव, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Bhadrapada Amavasya 2025: आजच्या शनी अमावस्येचं महत्त्व जाणून घ्या; 'या' चुका करणं टाळा

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT