Drishyam 3 : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण 2025-2026 मध्ये बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करणार आहे. सध्या त्याच्या खात्यात अनेक मोठे चित्रपट आहेत. पण चाहते त्याच्या 'दृश्यम 3' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. पण चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 'दृश्यम 3'मध्ये या चित्रपटाचा मूळ हिरो विजयचा आणि अजय देवगणसोबत क्रॉसओव्हर असू शकतो. या बातमीत किती तथ्य आहे हे स्वतः मोहन लाल यांनी सांगितले आहे.
वास्तविक, मोहनलाल यांच्या 'दृश्यम' फ्रँचायझीला लोकांचे खूप प्रेम मिळाले. त्यानंतर अजय देवगणने त्याचा हिंदीत रिमेक बनवला. आता चाहते ‘दृश्यम ३’ च्या पुढील अपडेटची वाट पाहत आहेत. दरम्यान, एका वृत्तपत्राशी बोलताना मोहन लाल म्हणाले की, क्रॉसओव्हरबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती नाही.
हिंदी 'दृश्यम 3' मध्ये मूळ विजयचा क्रॉसओव्हर असेल का ?
संवाद साधताना मोहन लाल म्हणाले की, 'दृश्यम 3' मधील क्रॉसओव्हरबद्दल त्यांच्याकडे कोणतीही माहिती नाही. असे काही घडावे, अशी त्यांची अशा आहे. साऊथच्या 'दृश्यम 3' बद्दल ते म्हणाले की, लोक आम्हाला विचारतात की तुम्ही लोक 'दृश्यम 3' मध्ये काम का करत नाही. पण ते सोपे नाही. हा चित्रपट एक मोठी जबाबदारी आहे, जी केवळ चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे.
ते पुढे म्हणाले की, कोणत्याही चित्रपटाचा सिक्वेल आणणे हे मोठे आव्हान असते. कारण लोक त्याची पहिल्या चित्रपटाशी तुलना करतात. आता लोक म्हणत आहेत की दुसरा चित्रपटही चांगला होता, म्हणून तिसराही आणा. पण तसे होऊ शकत नाही. चित्रपटाच्या तिसऱ्या भागावर काम सुरू असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. मोहनलालचा 'दृश्यम' हा 2013 सालचा क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. त्याचा हिंदी रिमेक 2015 मध्ये बनवण्यात आला होता.
हिंदी रिमेकला कसा प्रतिसाद मिळाला ?
अजय देवगणने मोहन लाल यांच्या 'दृश्यम' या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम केले होते. चित्रपटाला अप्रतिम प्रतिसाद मिळाला. पहिल्या भागानंतर चाहते दुसऱ्या भागाची वाट पाहत होते त्यामुळे 2 वर्षांनी 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला. विजय साळगावकर यांना पुन्हा एकदा लोकांनी भरभरून प्रेम दिले. आता तिसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली आहे. ज्यामध्ये मोहनलाल आणि अजय देवगण यांच्यात क्रॉसओव्हरची चर्चा आहे.
क्रॉसओव्हर म्हणजे काय ?
जेव्हा एका चित्रपटातील पात्र दुसऱ्या चित्रपटात असते. उदाहरणार्थ, शाहरुख खानच्या 'पठाण'मध्ये सलमान खानच्या टायगरच्या भूमिकेचा क्रॉसओव्हर होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.