Ajay Devgn : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू आणि रकुल प्रीत सिंगचा 'दे दे प्यार दे' २०१९ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे जास्त प्रमोशन झाले नाही, पण बॉक्स ऑफिसवर तो हिट ठरला. या रॉम कॉम चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याचे काम खूप दिवसांपासून सुरू होते. नुकतीच निर्मात्यांनीही याची घोषणा केली आहे. एका पोस्टद्वारे त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. लव फिल्म्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.
निर्मात्यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि सांगितले की हा चित्रपट १४ नोव्हेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंगसोबत कॉमेडी, रोमान्स आणि फॅमिली ड्रामा 'दे दे प्यार दे'च्या सिक्वेलमध्ये अभिनेता आर. माधवनही दिसणार आहे.
'दे दे प्यार दे' या चित्रपटात आर माधवनची एन्ट्री असेल टर्निंग पॉइंट
टी-सीरीजच्या अधिकृत X हँडलवर रिलीजच्या तारखेची घोषणा करताना, टी-सीरीजने लिहिले की, 'दे दे प्यार दे' १४ नोव्हेंबर २०२५ रोजी रिलीज होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंशुल शर्मा करणार आहे. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर माधवनच्या एंट्रीमुळे कथेत एक रोमांचक ट्विस्ट येईल. चित्रपटाचे शूटिंग पंजाब, मुंबई तसेच लंडन येथे होणार आहे.
अशी होती 'दे दे प्यार दे'ची कथा
'दे दे प्यार दे 2' ची कथा तिथून सुरू होईल जिथे आधीची कथा संपली होती. 'दे दे प्यार दे'ची कथा ५५ वर्षीय एनआरआय आणि घटस्फोटित आशिष मेहरा भोवती फिरते. हे पात्र अभिनेता अजय देवगणने साकारणे होते. आयशा (रकुल प्रीत सिंग) च्या प्रेमात पडतो, त्याच्यापेक्षा वयाने अर्ध्या मुलीची आणि तिच्या कुटुंबाची ओळख करून देतो. यानंतर परिस्थिती असे स्वरूप धारण करते की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. 'दे दे प्यार दे 2' ची स्क्रिप्ट ऑगस्ट २०२३ मध्ये अंतिम करण्यात आली होती. मार्च २०२४ मध्ये या चित्रपटाची निर्मितीनी अधिकृत घोषणा केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.