
R. Ashwin Biopic : भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक बायोपिक चित्रपट बनले आहेत. यामध्ये अनेक चित्रपट यशस्वी झाले आहेत आणि असे अनेक चित्रपट आहेत जे यशस्वी झाले नाहीत. बायोपिक चित्रपटांचा ट्रेंड कधीच ऑफबीट नसतो. या बायोपिक चित्रपटासाठी नुकतेच आणखी एक नाव समोर आले होते, ज्याची सध्या सोशल मीडियावर दोरदार चर्चा सुरु आहे. टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनवरही बायोपिक बनवला जाऊ शकतो, अशा अफवा पसरल्या होत्या. यामध्ये अश्विनची भूमिका साकारण्यासाठी दाक्षिणात्य अभिनेता अशोक सेल्वन याचे नाव पुढे येत होते, मात्र आता या अभिनेत्याने या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.
अलीकडेच भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, त्यानंतर त्याच्या बायोपिकची चर्चा पुन्हा एकदा रंगली. यापूर्वी २०२१ मध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, मुथय्या मुरलीधरन यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंच्या बायोपिक बनवण्यात आल्या आहेत, त्यामुळे अश्विनवरही चित्रपट बनवण्याची चर्चा होती.
अशोक सेल्वन यांचा व्हायरल फोटो
दाक्षिणात्य अभिनेता अशोक सेल्वनचा भारतीची जर्सी घातलेला फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर या अफवेला जोर आला की अभिनेता अशोक अश्विनची भूमिका साकारू शकतो. मात्र, आता अभिनेत्याने या गोष्टींना स्पष्टपणे नकार दिला आहे. यात काहीही तथ्य नसून अश्विनच्या बायोपिकमध्ये काम करत नसल्याचे त्याने सांगितले.
अश्विनने जवळपास १४ वर्षे भारतीय क्रिकेट संघाची सेवा केली आहे. टीम इंडियासाठी १०६ कसोटी सामने खेळलेल्या अश्विनने एकूण २०० डावात गोलंदाजी केली. अश्विनवर सर्वांचेच प्रेम आहे, त्यामुळे त्याच्या बायोपिकची चर्चा होणे निश्चितच होते, मात्र सध्या अशा कोणत्याही बायोपिकची चर्चा नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.