मनोरंजन बातम्या

Aishwariya Rai Bacchan: ऐश्वर्याने आराध्याबद्दल विचारताच दिलं सडेतोड उत्तर म्हणाली, 'ती माझी मुलगी आहे...'

Aishwariya Rai Bacchan IIFA Awards Viral Video: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनी आयफा नाईट्समध्ये हाजेरी लावली होती. त्या इव्हेंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या पापाराझींशी संवाद साधताना दिसतेय.

Saam Tv

आई झाल्यावर अनेक महिला पहिलं प्राधान्य त्यांच्या मुलांना देतात. अशीच काही अवस्था अभिनेत्री ऐश्वर्याची झालेली दिसत आहे. जेव्हापासून ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला आहे तेव्हापासून तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे. ऐश्वर्या तिच्या मुलीचे मनापासून संगोपन करताना दिसते. आराध्या देखील तिच्या आईच्या मागे मागे सावलीसारखी उभी राहाते.

अनेक फॅशन इव्हेंट आणि अवॉर्ड फंक्शनमध्ये ११ वर्षांची आराध्या नेहमी तिच्या आईसोबत उपस्थित असते. त्यावेळी ऐश्वर्या देखील तिच्या मुलीचं संरक्षण करताना दिसते. सोशल मीडियावर आराध्या आणि ऐश्वर्या यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. कालपासून असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याने आपल्या मुलीचा उल्लेख करणाऱ्या पापाराझींना जोरदार प्रतिउत्तर दिल आहे. काल संध्याकाळी ऐश्वर्याने तिच्या मुलीबद्दल आयफा नाईटला उपस्थित राहिली होती. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पापाराझींनी जेव्हा तिला आराध्याबद्दल प्रश्न विचारले तेव्हा तिने त्यांना जबरदस्त प्रतिउत्तर दिले. एका रिपोर्टरने ऐश्वर्याला विचारले की,"आराध्या नेहमी तुझ्यासोबतच असते. ती आधीपासूनच खुप चांगल्या गोष्टी शिकत आहे." असं त्यांनी विचारल्यावर अभिनेत्री त्यांना म्हणाली की,"ती माझी मुलगी आहे. ती नेहमी माझ्या सोबतच असेल." हे ऐकताच आराध्या खळखळून हासायला लागली. ऐश्वर्या आणि आराध्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

आयफा नाईट्समध्ये ऐश्वर्याने गोल्डन एम्ब्रॉयडरी डिझाईन असलेला ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. त्यावर साधा मेकअप आणि लाल लिप्स्टिक लावली होती. या ब्लॅक ग्लॅमरस लूरकमध्ये ऐश्वर्या खुप छान दिसत होती. तिच्या सोबत आराध्याने पांढऱ्या रंगाचा जॅकेट, लेगिंग्ज आणि काळ्या बुटांमध्ये खुप सुंदर दिसत होती.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT