Aishwarya Rai Bachchan's Fans Slam Vivek Agnihotri: यंदाचं कान्स फेस्टिव्हल फ्रान्समध्ये होत आहे. यंदाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक हॉलिवूडसह बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सेलिब्रिटींच्या लुकमध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले होते. ऐश्वर्या आणि ऐश्वर्याच्या असिस्टंटबद्दल एक ट्विट केले आहे, हे ट्विट पाहून नेटकरी कमालीचे संतापले. सध्या सोशल मीडियावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना ट्रॉलर्स ट्रोल करत आहे.
ऐश्वर्याने मोठ्या चांदीच्या हुडीसोबत ब्लॅक गाऊन सुटवर माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर स्पेशल पोज दिल्या. यामुळे ती कमालीची चर्चेत असली तरी त्याहून अधिक ट्रोल होतेय. फ्रान्समध्ये तिच्या मागे मागे तो ब्लॅक गाऊन सावरणारी एक व्यक्ती सध्या चर्चेत आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसुन ती तिची असिस्टंट आहे. नुकताच विवेक अग्निहोत्रींनी या दोघींबद्दल ही एक पोस्ट केली आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पोस्टमध्ये म्हणतात, “तुम्ही पोशाख गुलाम (Costume Slaves) हा शब्द कदाचित ऐकला असेल?, या बहुतेक मुली आपल्याला दिसतात. आपल्याला असे गुलाम भारतातील अनेक महिला सेलिब्रिटींसोबत पाहायला मिळतील. अशा अस्वस्थ आणि विचित्र फॅशनसाठी आपण इतके विचित्र आणि अत्याचारी का बनत आहोत? ” सध्या विवेक अग्निहोत्रींची ही पोस्ट सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे.
विवेक अग्निहोत्रींची पोस्ट पाहून नेटकरी म्हणतात, ‘तुम्ही का जळताय? तुम्हाला कान्सने आमंत्रित केले म्हणून का ?’ तर आणखी एक म्हणतो, ‘वैयक्तिक निवड, तुमचा कोणताही व्यवसाय बरोबर नाहीय.’ तर आणखी एक जण म्हणतो, ‘मला वाटतं ब्रँड कंपनी त्यांचा ब्रँड रेड कार्पेटवर दिसावा म्हणून त्यांना पैसे देत असतील, शेवटी हा शो - बिझ चा एक प्रकार आहे.’ तर अनेकांनी विवेक अग्निहोत्रींना पाठींबा दर्शवला आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे ते बरेच चर्चेत आले. तेव्हा पासून त्यांची कमालीची चर्चा होऊ लागली. विवेक अग्निहोत्रींची परखड आणि स्पष्ट मत मांडणारे दिग्दर्शक म्हणून ओळख रूढ झाली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.