Aishwarya Rai Bachchan Cannes Film Festival Outfit Twitter
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai Bachchan Cannes Look: ‘नाकापेक्षा मोती जड...’ ऐश्वर्या लूकमुळे झाली तुफान ट्रोल

Aishwarya Rai Bachchan At Cannes Film Festival Look: ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकने पुन्हा एकदा सर्वांचेच लक्ष वेधले.

Chetan Bodke

Aishwarya Rai Bachchan Cannes Film Festival Outfit: यंदाचं कान्स फेस्टिव्हल फ्रान्समध्ये होत असून या फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. हॉलिवूडसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी पहिल्यांदाच या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. अनुष्का शर्मा, मृणाल ठाकूर, सारा अली खान सह आलिया भट्टने यंदाच्या फेस्टिव्हलला पदार्पण केले असून त्यांनी रेड कार्पेटवरील लूकने बोल्डनेस तडका लावला होता. पण यावेळी सर्वाधिक चर्चेत आहे, ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकने पुन्हा एकदा सर्वांचेच लक्ष वेधले.

ऐश्वर्या नेहमीच फॅशनच्या बाबतीत चर्चेत असते. तिच्याबद्दल बोलायचे तर, ऐश्वर्यासाठी कान्स फिल्म फेस्टिव्हल काही नवं नाही. तिचं हे यंदाचं २१ वं वर्ष आहे. नेहमीच युनिक फॅशनमुळे चर्चेत राहिलेल्या ऐश्वर्याने यंदा एक खास ड्रेस घातला होता. ऐश्वर्याच्या गाऊनमध्ये दिसलेल्या हुडीबद्दल नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत तिला पुन्हा एकदा ट्रोल केले आहे. यंदाच्या कान्स फेस्टिव्हलला एका फ्रेंच फोटोग्राफरने उर्वशी रौतेलाला ऐश्वर्या समजला. त्यामुळे सध्या ऐश्वर्या सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आहे.

ऐश्वर्या राय बच्चन बुधवारी कान्स २०२३ साठी फ्रान्समध्ये पोहोचली. इंडियाना जोन्स आणि द डायल ऑफ डेस्टिनीच्या स्पेशल स्क्रीनिंग दरम्यान गुरुवारी रात्री ऐश्वर्याने रेड कार्पेटवर अनोख्या अंदाजात हजेरी लावली होती, सोशल मीडियावर तिच्या लूकची चर्चा जेवढी सुरू आहे, त्याहून अधिक ती ट्रोल होतेय.

तिचा हा ड्रेस पाहून नेटकरी म्हणतात, स्वयंपाकघरातून ॲल्युमिनियमची फॉइल उचलून घातली का? असं म्हणत तिला ट्रोल केलंय. तर आणखी एक युजर तिला म्हणतो, इतका भंगार कोण ड्रेस घालतं का गं?, नाकापेक्षा मोती जड झालाय... असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे, तर जमत नाही तर घालावं कशाला इतका जड ड्रेस... असं म्हणत तिच्या ड्रेसची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली. पण जरी तिच्या फॅशनमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला असला तरी, तिला तिचे चाहते ‘कान्सची क्विन’ म्हणूनच संबोधत होते. यावेळी तिची लेक आराध्या बच्चन देखील या फिल्म फेस्टिव्हलसाठी उपस्थित होती. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय बच्चन गेल्या २२ वर्षांपासून हजेरी लावत आहे, सर्वात आधी २००२ मध्ये हजेरी लावली होती.

कान्स फिल्म फेस्टिव्हलची खासियत म्हणजे, यामध्ये हॉलिवूडसह अनेक बॉलिवूड अभिनेत्री हजेरी लावतात. यांच्या खास फॅशन शैलीने सर्वांनाच विविध लूक पाहायला मिळतात. हा फिल्म फेस्टिव्हल १६ मे ते २७ मे पर्यंत चालणार असून यामध्ये आतापर्यंत सारा अली खान, मृणाल ठाकूर, उर्वशी रौतेला, ईशा गुप्ता सह अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Scooter India: भारतीयांची फेव्हरेट ठरलेली 'ही' Scooter; 35,000,000 लोकांनी केली खरेदी

Maharashtra Live News Update : राज ठाकरे लोकलने चर्चगेटला रवाना

Raj Thackeray Mumbai Local: राज ठाकरेंचा दादर-चर्चगेट प्रवास, मुंबईकरांसोबत मारल्या गप्पा

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक, बाहेर पडण्याआधी वेळापत्रक वाचाच

Halloween 2025: दीपिका झाली 'लेडी सिंघम', रणवीर सिंग स्पायडरमॅन...; बॉलिवूडच्या हॅलोविन पार्टीमध्ये या सेलिब्रिटींचा जलवा

SCROLL FOR NEXT