Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'ची ऑफर स्वीकारणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर मराठमोळ्या अभिनेत्रीचं एका वाक्यात उत्तर

Fans Question On Bigg Boss Marathi Offer : : 'बिग बॉस मराठी' चे वेड अनेक प्रेक्षकांना आहे. आपले आवडते कलाकार बिग बॉसच्या घरात दिसावे असे त्यांना वाटत असते. अशात एका चाहत्यांनी मराठी अभिनेत्रीला 'बिग बॉस मराठी' च्या ऑफर संबंधित प्रश्न केला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' चा (Bigg Boss Marathi ) सीझनचा ग्रँड फिनाले आज म्हणजे 6 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजल्यापासून पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी या सीझनच्या अंतिम सोहळ्याची आतुरतेने वाट पाहिली आहे. यंदाचा सीझन महाराष्ट्रात खूप गाजला. 'बिग बॉस मराठी' चा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांसोबतच कलाकार देखील उत्सुक असतात. वेळोवेळी कलाकार आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात.

मराठी मनोरंजन सृष्टीतील कमाल अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar ) यांना 'बिग बॉस'वर त्यांच्या चाहत्यांनी प्रश्न केला आहे. ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या विविध लूकचे फोटो ती सोशल मिडिया शेअर करत असते. तसेच ती अनेक गाण्यांवर पती अभिनेते अविनाश नारकर यांच्यासोबत रील्स देखील बनवत असते. त्यांच्या रील्सचे व्हिडिओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होतात.

नुकतंच ऐश्वर्याने 'आस्क मी सेशन' असा सेशन इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून घेतला होता. तेव्हा त्याच्या एका चाहत्यांनी तिला विचारले की, "बिग बॉसची ऑफर आली तर स्वीकारणार का? " यावर अभिनेत्रीने हटके उत्तर दिलं ती म्हणाली, "नाही" असे एका शब्दात उत्तर दिलं. तिच्या या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या ऐश्वर्या नारकर या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहेत.

'बिग बॉस मराठी 5'च्या शेवटच्या दिवसात अनेक कलाकारांनी घरातील सदस्यांना भेट दिली आणि त्यांच्यासोबत गेम खेळले. घरातील सदस्यांनी प्रेक्षकांच्या मनात चांगलचं घर निमार्ण केलं आहे. 'बिग बॉस मराठी 5' पर्व 28 जुलैपासून सुरु झाले होते. कोण उचलणार 'बिग बॉस मराठी 5' ट्रॉफी याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

Multani Mitti : काळेभोर चमकदार केस हवेत? मग वापरा फक्त मुलतानी माती

सकाळी सकाळी शरीरात दिसणारे 'हे' बदल सांगतात किडनी फेल होतेय

SCROLL FOR NEXT