Aishwarya Narkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aishwarya Narkar : "दूध का दूध,पानी का पानी...", ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी दिलं सडेतोड उत्तर

Aishwarya Narkar New Dance Reel : मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नुकताच एक डान्स व्हिडीओ इन्स्टाग्राम शेअर केला आहे. त्यावर त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अभिनेते अविनाश नारकर हे एक क्युट कपल आहे. ते कायम आपल्या डान्स रील्समुळे चर्चेत असतात. त्यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. ही जोडी कायम हटके गाण्यांवर भन्नाट डान्स करून त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करते. त्यांच्या व्हिडीओला एकीकडे खूप चांगला प्रतिसाद दिला जातो. तर अनेक वेळा त्यांना ट्रोल देखील केले जाते.

नुकताच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर एक डान्स रील शेअर केली आहे. या दोघांनी 'चिकनी चमेली' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहत्यांनी त्यांच्या डान्स आणि एनर्जी कौतुक केले आहे. तर दुसरीकडे त्यांना ट्रोल केले गेले आहे. एका महिला युजरने त्यांच्या व्हिडीओला कमेंट केली की, "दोघांना पण म्हातारचळ लागलंय..." यावर ऐश्वर्या नारकर यांनी त्या महिलेला आणि त्यांना ट्रोल करणाऱ्या व्यक्तींना सडेतोड उत्तर दिले आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात मागे त्यांच्या डान्सचा व्हिडीओ त्यावर त्या महिला युजरची कमेंट दिसत आहे. त्यावर अभिनेत्रीने त्या महिला युजरचे बीचचे फोटो देखील लावले आहे आणि लिहिलं की, "दूध का दूध…पानी का पानी" अशाप्रकारे ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी चांगलेच उत्तर दिले आहे.

दुसरीकडे ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर अजून एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये एका युजरने त्यांच्या डान्सचे भरभरून कौतुक केले आहे. त्या युजरने लिहिलं की, "आयुष्य कसं जगाव हे या जोडीकडून शिकावे. खूप भारी.. वयाची परवा न करता... खूप फिट आहेत बघा..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

SCROLL FOR NEXT