Viral Video: ही अशी का चालते? प्रसिद्ध अभिनेत्रीच्या विचित्र वॉकमुळे झाली ट्रोल, युजर्स म्हणाले, वेड्यासारखी का...

Viral Video: आशिकी गर्ल अनु अग्रवालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नेटकऱ्या तिच्या चालण्याबद्दल विचित्र कमेंट करत आहेत आणि तिच्या लूकची तुलना एका अभिनेत्रीशी करत आहेत.
anu agarwal
anu agarwalSaam Tv
Published On

Viral Video: 'आशिकी' चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अनु अग्रवालचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, अनु अग्रवाल एका कार्यक्रमातून बाहेर येताना दिसत आहे. या व्हिडिओतील तिच्या लुक आणि तिच्या वॉकमुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रॉल करण्यात येत आहे.

अनु अग्रवालचा लेटेस्ट व्हायरल व्हिडिओ

आज अनु अग्रवालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या नवीन लूकमध्ये अनु काळ्या रंगाचा गाऊन परिधान करताना दिसत आहे. या गाऊनमध्ये तिचा लूक उठून दिसण्यासाठी तिने चांदीचा मुकुट घातला आहे आणि काळ्या रंगाचा श्रगही घेतला आहे. खरंतर, यावेळी अनुला तिच्या लूकसाठी नाही तर तिच्या चालण्यामुळे ट्रोल केले जात आहे.

anu agarwal
Raid 2: 48 कोटींच्या 'रेड 2' साठी अजय देवगणने घेतले बजेटचे अर्धे मानधन; तर रितेश देशमुखला मिळाले इतकेच कोटी रुपये

अनुचा हा व्हिडिओ आता नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्याही या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. अनुच्या चालण्यावर वापरकर्ते विशेषतः कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले, 'म्हणजे ती साधी चालही करू शकत नाही, तिला सगळीकडे रॅम्प वॉक करायची गरज नाही.', दुसऱ्या एका युजरने लिहिले, 'मला माहित नाही या बिचाऱ्या मुलगी का अशी करत आहे', दुसऱ्या एका युजरने लिहिले, 'ठीक आहे ती ९० च्या दशकातील सुपरस्टार आहे पण ती अशी का चालत आहे..

anu agarwal
Thalapathy Vijay: थलापथी विजयच्या गाडीवर चाहत्याची उडी; रॅलीत घडला धक्कादायक प्रकार

सोशल मीडियावर काही वापरकर्त्यांनी अनु अग्रवालच्या लूकची प्रशंसा केली आहे, तर काहींनी तिला मोठ्याप्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. एका नेटकाऱ्याने लिहिले, हे काय झालं तिला आधी किती सुंदर दिसायची. एकाने लिहिले ही अशी का चालते? काय सांगितलं डॉक्टरांनी कधी ठीक होईल. एकाने लिहले, वेड्यासारखी का चालत अली ही की नशेमुळे अशी चालते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com