AIFF SAAM TV
मनोरंजन बातम्या

AIFF: अजिंठा -वेरूळ चित्रपट महोत्सवाचा समारोप, सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट कोणता?

Best Indian Film : नुकताच अजिंठा -वेरूळ चित्रपट महोत्सवाचा समारोप पार पडला आहे. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. माधव सावरगावे

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट (AIFF) महोत्सवाचा समारोप समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रोझोन मॉल येथे संपन्न झाला. यावेळी दिग्दर्शक फराह खान यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ऑस्कर विजेता साऊंड डिझाईनर पद्मश्री रसूल पूकुट्टी उपस्थित होते. इतर मान्यवरांनी देखीले सोहळ्याला उपस्थिती लावली.

महोत्सवातील यंदाचे सुवर्ण कैलास पारितोषिक 'शांतीनिकेतन' या चित्रपटास प्रदान करण्यात आले. चित्रपटाचे दिग्दर्शक दिपांकर प्रकाश यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक फराह खान यांचा मास्टरक्लास’मध्ये प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल. दिग्दर्शक मोहम्मद रसुल यांचा ‘दि सिड ऑफ दि सॅक्रीड फिग’ हा सिनेमा महोत्सवाची समारोप फिल्म म्हणून आली.

पारितोषिक विजेत्या चित्रपटांची आणि व्यक्तींची यादी

(१) सुवर्ण कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपट) : शांतीनिकेतन

दिग्दर्शक – दिपांकर प्रकाश

स्वरूप : १ लक्ष रुपये आणि सुवर्ण कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र

(२) रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट अभिनेता - भारतीय चित्रपट ) : नीरज सैदावत

चित्रपट: शांती निकेतन | दिग्दर्शक: दीपांकर प्रकाश

स्वरूप : २५००० रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र

(३) रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्री - भारतीय चित्रपट ) : भनिता दास

चित्रपट: विलेज रॉकस्टार्स २ | दिग्दर्शक: रीमा दास

स्वरूप : २५००० रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र

(४) रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट पटकथा - भारतीय चित्रपट ) : सुभद्रा महाजन

चित्रपट: सेकंड चान्स

स्वरूप : २५००० रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र

(५) स्पेशल ज्यूरी मेन्शन (चित्रपट ) : विलेज रॉकस्टार्स २

दिग्दर्शक: रीमा दास

(६) स्पेशल ज्यूरी मेन्शन (अभिनेत्री) : नंदा यादव

चित्रपट: शांती निकेतन | दिग्दर्शक: दीपांकर प्रकाश

(७) बेस्ट शॉर्ट फिल्म (मराठवाडा स्पर्धा) :ठोकळा

दिग्दर्शक: वैभव निर्गुट

स्वरूप : २५००० रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र

(८) एमजीएम शॉर्ट फिल्म स्पर्धा (बेस्ट शॉर्ट फिल्म ) : जाणीव

दिग्दर्शक: स्वप्नील सरोदे

स्वरूप : २५००० रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र

(९) फ्रिप्रेसी इंडिया अवॉर्ड (सर्वोत्त्कृष्ट चित्रपट ) : इन दि आर्मस ऑफ दि ट्री

दिग्दर्शक – बबाक खाजेपाशा

(१०) ऑडियन्स चॉईस अवॉर्ड (सर्वोत्त्कृष्ट चित्रपट ) : सवाना अँड द माउंटन

दिग्दर्शक: पाओलो कार्नेरो

महोत्सवात दिग्दर्शक फराह खान म्हणाल्या, "आज मला या महोत्सवात सहभागी होऊन मनस्वी आनंद झाला आहे. हा महोत्सव मराठवाड्यात अत्यंत तळमळीने आयोजित केला जात असून या माध्यामतून या भागातील कलाकारांना एक व्यासपीठ मिळाले आहे. हे ऐकून मी तत्काळ यामध्ये सहभागी होण्यास होकार दिला."

महोत्सवाचे अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणाले की, "महोत्सवाबद्दल प्रचंड आवड असणारी प्रेक्षकं मी येथे पाहिले. या भागात अनेक प्रतिभासंपन्न कलाकार आहेत. मी पहिल्यांदा अशा महोत्सवात सहभागी झालो आहे, जिथे मी एकही चित्रपट पाहिला नाही. याचे कारण म्हणजे खूप व्यस्ततेत हे पाच दिवस गेले. मात्र, सर्व मास्टर क्लास आणि डिस्कशन मी ऐकली आणि त्यातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या."

ऑस्कर विजेता साऊंड डिझाईनर पद्मश्री रसूल पूकुट्टी म्हणाले, "मराठवाड्यासारख्या भागामध्ये हा चित्रपट महोत्सव होत आहे. ही निश्चितपणे कौतुकास्पद बाब आहे. महोत्सव इतका यशस्वी होण्यामध्ये येथील प्रेक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. विषेशकरून येथील प्रेक्षक चित्रपटांवर प्रचंड प्रेम करणारे आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रूपाली पाटील ठोंबरे घेणार अजित पवारांची भेट

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT