RRR Movie Poster  Saam Tv
मनोरंजन बातम्या

HCA Films Awards 2023: दाक्षिणात्य चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये डंका, RRR ने एक नाही थेट ४ पुरस्कार कमावले

नुकतेच हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्समध्ये RRR ने अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले आहेत.

Chetan Bodke

HCA Films Awards Win In RRR Film: दाक्षिणात्य चित्रपटांतील अनेक चित्रपट सध्या भारतातच नाही तर परदेशातही चांगलाच धुमाकूळ घालत आहे. त्या चित्रपटाला गेल्या काही दिवसांपुर्वी गोल्डन ग्लोब पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी चित्रपटातील सर्वच टीमचे सर्वत्र तोंडभरुन कौतुक करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा या चित्रपटाने हॉलिवूडमध्ये आपला डंका वाजवला आहे.

नुकतेच हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्समध्ये RRR ने अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले आहेत. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट ॲक्शन फिल्म, सर्वोत्कृष्ट स्टंट आणि सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकला आहे. 12 मार्च रोजी त्या पुरस्कारांचे वितरण होणार असून नुकतेच या चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. RRR हा एक पीरियड ड्रामा चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले आहे.

RRR, Jr NTR आणि राम चरण अभिनीत, हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कारांमध्ये अनेक पुरस्करांवर आपले नाव कोरले आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ॲक्शन फिल्मचा पुरस्कार मिळाला असून सर्वोत्कृष्ट स्टंट आणि सर्वोत्कृष्ट गाणे (नाटू नाटू)या श्रेणींमध्ये आपले नाव कोरले आहे. सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे RRR या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

RRR हा एक पीरियड ड्रामा चित्रपट असून ज्युनियर एनटीआर आणि राम चरण अनुक्रमे आदिवासी नेता कोमाराम भीम आणि क्रांतिकारक अल्लुरी सीता रामा राजू यांच्या भूमिकेत आहेत. स्वातंत्र्यपूर्व भारतातील काल्पनिक गाथा, त्यांच्या मैत्रीचा शोध घेते आणि दडपशाही विरुद्धच्या त्यांच्या लढ्यावर प्रकाश टाकते. या चित्रपटातून आलिया भट्टचे टॉलीवूड पदार्पण आहे. अजय देवगण, श्रिया सरन, समुथिरकणी, रे स्टीव्हनसन, मकरंद देशपांडे आणि ऑलिव्हिया मॉरिस या कलाकारांचा समावेश आहे. त्याचे संगीत एमएम कीरावानी यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT