Ranbir Kapoor, Alia Bhatt, Brahmasat Saam Tv
मनोरंजन बातम्या

रणबीर कपूर-आलिया भट्ट महाकालचे दर्शन न घेताच परतले; काय आहे त्यामागचं कारण?

महाकालच्या दर्शनासाठी पोहोचलेल्या 'ब्रह्मास्त्र'च्या टीमला तेथे विरोधाला सामोरे जावे लागले आहे.

कोमल दामुद्रे

मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा बहुप्रतीक्षित ब्रह्मास्त्र चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान रणबीर आणि आलिया त्यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनमध्ये पोहोचले होते. यावेळी चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जीही त्यांच्यासोबत होता. दरम्यान, महाकालच्या दर्शनासाठी पोहोचलेल्या 'ब्रह्मास्त्र'च्या टीमला तेथे विरोधाला सामोरे जावे लागले आहे.

नुकतीच ब्रह्मास्त्रची टीम महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनमध्ये गेली असता यावेळी तेथे आंदोलन करण्यात आले. चित्रपटाची टीम महाकालच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचण्यापूर्वी बजरंग दलाचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन महाकालेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर जमले. त्यांनी श्रीरामच्या घोषणा देत निदर्शने केली.

महाकाल मंदिराच्या (Temple) प्रवेशद्वारावरील गोंधळामुळे दिग्दर्शक अयान मुखर्जीने रात्री उशिरा दर्शन घेतले. अयान मुखर्जीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये दिग्दर्शक अयान मुखर्जी आरतीमध्ये तल्लीन झालेला दिसतो आहे. दरम्यान, दर्शनानंतर अयान मुखर्जीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अयानने चित्रपट यशस्वी करण्यासाठी साकडे घातले आहे. चित्रपट (Movie) प्रदर्शित होण्यापूर्वी महाकालचं दर्शन व्हावे अशी माझी इच्छा होती, जी आज पूर्ण झाली आहे, असं सांगितलं.

माहितीनुसार, परिसरातील गदारोळ पाहता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मंदिरात जाऊ शकले नाहीत. चित्रपटातील रणबीर कपूरच्या एका जुन्या वक्तव्यामुळे विरोध होत असल्याचं बोललं जात आहे. चित्रपटात गोमातेबाबत रणबीर कपूरने चुकीचे वक्तव्य केल्याचे एका सीनमध्ये आहे. त्याच्या या वक्तव्याचा विरोध म्हणून निदर्शने करण्यात आली आहेत.

'ब्रह्मास्त्र' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परंतु बहिष्काराचा ट्रेंड आता हळूहळू ब्रह्मास्त्र चित्रपटाला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. बॉयकॉटच्या शर्यतीत प्रेक्षकांनी अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचाही समावेश केला आहे. आता चित्रपटाबाबत निदर्शने होण्यास सुरूवात झाली. सध्या 'बायकॉट ब्रह्मास्त्र' हा ट्रेंड सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाबाबत सुरू झालेल्या या विरोधामुळे निर्मात्यांची चिंता वाढली आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी, मौनी रॉय आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT