Ajay Devgn Next Movie Maidaan Poster Release Instagram @zeestudioofficial
मनोरंजन बातम्या

Ajay Devgn Movie: हिट चित्रपट देणाऱ्या अजयचा रखडलेला 'मैदान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Maidaan Poster Release: 'भोला' प्रदर्शित होण्याआधीच अजयच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा झाली आहे.

Pooja Dange

Ajay Devgn Upcoming Movie: अजय देवगण सध्या त्याच्या 'भोला' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ३० मार्चला अजय देवगणचा 'भोला' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. 'भोला' प्रदर्शित होण्याआधीच अजयच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा झाली आहे.

अजय देवगणचा 'दृश्यम २' हा चित्रपट १८ नोव्हेंबर, २०२२ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटादरम्यान अजयने 'भोला' चित्रपटाची घोषणा केली होती. आता 'भोला' दरम्यान त्यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. 'मैदान' असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामा आहे.

अजय देवगणच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच झी स्टुडिओच्या ऑफिशियल सोशल मीडियावरून शेअर करण्यात आले आहे. अजयचा अँग्री यंगमॅन लुक तुम्हाला या पोस्टरमध्ये दिसेल. या चित्रपटाची निर्माती बोनी कपूर करणार आहेत. तर या चित्रपटाचे दिगदर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी केले आहे. एआर रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.

एक व्यक्ती, एक विश्वास, एक स्पुर्ती अशी 'मैदान'ची टॅगलाईन आहे. हा चित्रपट गेली अनेक वर्ष चर्चेत होता. गेल्या काही वर्षपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. अखेर २३ जून, २०२३ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ३० मार्चला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी भोला प्रदर्शित होणार आहे.

अजय देवगणचा 'मैदान' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक सय्यद अब्दुल रहीम चित्रपट आधारित आहे. सय्यद अब्दुल रहीम यांना फुटबॉल विश्वात खूप आदर आहे.

भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळाची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांना जाते. कॅन्सरशी झुंज देऊनही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवणारा रहिम हे फायटर मानले जातात. सय्यद अब्दुल रहीम हे 1950 ते 1963 पर्यंत भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यात भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू

Mhada 2025 : म्हाडाकडून मुंबईतील १४९ अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव; नोंदणी अन् अर्ज कुठे कराल? जाणून घ्या

Kapil Sharma: रिंग ऐकली नाहीतर पुढचा हल्ला मुंबईत; कॅफेवरील गोळीबारनंतर कपिल शर्माला धमकी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच २,१०० रुपये मिळणार, महायुतीतील मंत्र्याचं मोठं विधान

Maharashtra Politics: युतीसाठी आम्ही सक्षम, उद्धव ठाकरे गरजले, युतीबाबत इंडियाच्या अटी-शर्ती नाहीत'

SCROLL FOR NEXT