Ae Watan Mere Watan: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा देशभक्तीवर आधारित असलेल्या 'ए वतन मेरे वतन' चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये सारा स्वतंत्र्य सैनिकेच्या भूमिकेत दिसत आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या असलेल्या या चित्रपटात सारा एका वेगळ्याच भूमिकेत दिसत आहे. कन्नन अय्यर दिग्दर्शित चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.
'ए वतन मेरे वतन' च्या टीझरमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील काही दृश्य दाखवण्यात आली आहे. पांढऱ्या साडीत सारा दिसत असून रेडिओवर ती बोलताना दिसत आहे. त्या टीझरमध्ये ती म्हणते, इंग्रजांना वाटते की त्यांनी भारत छोडो आंदोलनाचे डोके ठेचले आहे, पण हा स्वातंत्र्यासाठी असलेला आवाज कोणीही कैद करु शकत नाही. हा भारताचा आवाज आहे.' तेवढ्यात दरवाजा कोणी तरी ठोठावतं, त्या दरवाजाकडे ती शेवट पर्यंत पाहत राहते.
सारा आपल्या चित्रपटाविषयी आणि भूमिकेविषयी म्हणते,'चित्रपटाविषयी मी फारच उत्सुक आहे. मी सर्वात आधी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि धर्माटिक एंटरटेन्मेंटने मला या चित्रपटात सहभागी करुन घेतल्या बद्दल त्यांचे आभार मानते. या चित्रपटाची फारच दमदार कहाणी आहे. मला ही भूमिका साकारताना एक भारतीय म्हणून आणि एक अभिनेत्री म्हणून फारच अभिमान वाटतो.'
त्यासोबतच पुढे सारा म्हणते, 'शौर्य, सामर्थ्य आणि धैर्यशील व्यक्तिरेखा साकारायला मिळत आहे, याचा अभिमान वाटतो. दिग्दर्शक कन्नन अय्यर यांच्यासोबत काम करण्याचा खूप चांगला अनुभव होता. कारण ते स्वतः कथेत भावनिकरित्या गुंतलेले आहेत.'
'ए वतन मेरे वतन' ही मुंबईतील एका महाविद्यालयीन तरुणीची कथा आहे जी स्वातंत्र्यसैनिक बनते. हा चित्रपट 1942 मधील भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. भारतातील तरुणांचे धैर्य, देशभक्ती, त्याग आणि साधन संपत्तीची कथा सांगते.
चित्रपटात सारा उषा मेहता यांची भूमिका साकारणार आहे. भारत छोडो आंदोलनात गुप्त ऑपरेटर म्हणून उषा यांनी देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका साकारली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.