Aditya Narayan Threw Phone Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aditya Narayan Threw Phone: आदित्यच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?; चाहत्यानं सांगूनच टाकलं

Aditya Narayan News: छत्तीसगडच्या भिलाईमधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्य स्टेजवर गात असताना चाहत्याचा फोन हिसकावत फेकून देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी कॉन्सर्टमध्ये काय किस्सा घडलं, हे त्या चाहत्याने सांगितले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aditya Narayan Threw Phone

सध्या गायक आदित्य नारायण एका व्हायरल व्हिडीओमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. छत्तीसगडच्या भिलाईमधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्य स्टेजवर गात असताना चाहत्याचा फोन हिसकावत फेकून देतानाचा आणि त्याच्या हातातला माईक चाहत्याला मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नेमकं त्यावेळी कॉन्सर्टमध्ये काय किस्सा घडला होता. हे त्या चाहत्याने एका मुलाखतीत सांगितले आहे. (Bollywood)

लोकेश चंद्रवंशी या विद्यार्थ्याने या घटनेसंबंधित सांगितले की, "लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट सुरू होते, मी स्टेजसमोर उभा होतो. आदित्य सर स्टेजवर परफॉर्म करत होते. परफॉर्म करत असताना चाहत्यांचा फोन घेत, चाहत्यांसोबत ते सेल्फी काढत होते. मी स्टेजजवळ उभा होतो म्हणून मी त्याला माझा फोन सेल्फीसाठी दिला. पण त्याने त्याच्या माईकने माझ्या हाताला मारलं आणि नंतर कोणतेही कारण नसताना माझा फोन त्याने फेकून दिला." (Bollywood News)

"तो सर्वांसोबत सेल्फी घेत होता त्यामुळे मला वाटले की तो माझ्यासोबतही सेल्फी घेईल म्हणून मी त्याला माझा फोन दिला. त्यांनी असे करायला नव्हते पाहिजे. माझा फोन फेकून दिल्यानंतर त्याने अनेकांसोबत फोटो काढले. पण तो माझ्यासोबत जो काही वागला ते खूप चुकीचे होते. त्यालाच माहिती त्याचा मुड कसा होता. आम्ही त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या गाण्यामुळे त्याच्या कॉन्सर्टला जातो. तसं पहायला गेलं तर आमच्याकडे कलाकारांची कमी नाहीये" असं मुलाखतीमध्ये लोकेश चंद्रवंशी म्हणाला. लोकेशला पोलिस तक्रार करणार का असे विचारले असता मला त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार द्यायची नाही. अशी प्रतिक्रिया त्या चाहत्याने दिली. (Aditya Narayan)

इव्हेंट मॅनेजरने या घटनेबाबत एका मुलाखतीत सांगितलं. "तो मुलगा कॉलेजचा विद्यार्थी नव्हता, तो कॉलेजबाहेरचा कुणीतरी असावा. तो सारखा सारखा आदित्यचे पाय ओढत होता. त्याने आपला फोन आदित्यच्या पायावर अनेक वेळा मारला होता. म्हणून आदित्यने तसं केलं." (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT