Aditi Rao Hydari Instagram @aditiraohydari
मनोरंजन बातम्या

Aditi Rao Hydari: राजघराण्यातील 'या' अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया काही खास गोष्टी

वयाच्या १७ व्या वर्षी डेट करण्याऱ्या या राजकुमारीने सर्वांपासून लपवून ठेवले होते लग्न.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aditi Rao Hydari Birthday Special: बॉलिवूडच्या अनेक पिरियोडिक चित्रपटांमध्ये अभिनेत्रींनी राजकन्यांची भूमिका साकारली आहे. त्यांची चित्रपटांतील वेशभूषा पाहून असे वाटते की त्या खरोखरच राजघराण्यातील आहेत. पण आज आपण चित्रपटांतील नाही तर खऱ्या राजकुमारीबद्दल बोलणार आहोत. हिंदी आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरी. अदिती दरवर्षी 28 ऑक्टोबरला तिचा वाढदिवस साजरा करते. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या संबंधित काही खास गोष्टी...

अदितीचा जन्म 1985 साली हैदराबादमध्ये झाला. ती एका राजघराण्यातील राजकुमारी आहे. तिचे पणजोबा अकबर हैदरी हे 1869 ते 1941 पर्यंत हैदराबादचे पंतप्रधान होते. तसेच तिचे काका मोहम्मद सालेह अकबर हैदरी हे देखील आसामचे राज्यपाल होते. आदितीची आई सुद्धा राजघराण्यातील आहे. तिचे आजोबा जे. रामेश्वर राव हे तेलंगणातील वानपर्थीचे राजे होते.

आदितीच्या आईने प्रेमविवाह केला होता, पण त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. अवघ्या दोन वर्षांची असताना तिचे आईवडील वेगळे झाले. घटस्फोटानंतर, वडिलांना आदितीचा ताबा हवा होता, परंतु अभिनेत्रीने तिच्या आईजवळ राहणे पसंत केले. खुद्द आदितीने एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला आहे. आदितीची आई ठुमरी गायिका आहे. तर अदिती भरतनाट्यममध्ये प्रवीण आहे. फार कमी लोकांना माहित आहे की वयाच्या १७ व्या वर्षी आदितीने एका अभिनेत्याला डेट करायला सुरुवात केली होती. (Actress)

Aditi Rao Hydari

चार वर्षांनंतर दोघांनी 2007 मध्ये लग्न केले. सत्यदीप मिश्रा असे या अभिनेत्याचे नाव आहे. त्यांनी लग्न केल्याची बातमी लोकांसमोर येऊ दिली नाही. त्यानंतर आदितीने 'दिल्ली 6' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2006 मध्ये तिने एका मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आदिती राव आमिर खानची मेहुणी आहे. ती किरण रावची मामेबहिण आहे. आदितीने आत्तापर्यंत रॉकस्टार, मर्डर 3, बॉस, सुंदर, वजीर आणि फितूर यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stone: किडनीसाठी घातक ठरतील 'हे' पदार्थ, आजच खाणं टाळा

Devendra Fadnavis : मी १०० रुपये देतो, ठाकरेंच्या मागील १० भाषणात विकासावर एक वाक्य दाखवा; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Government Hostel Allowances: मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ, सरकारचा मोठा निर्णय

Beed Flood: अतिवृष्टीनं शेतीचा चिखल, सरकार ओला दुष्काळ’ जाहीर करणार का?

Wednesday Horoscope : भाग्यकारक घटना घडणार; ५ राशींच्या लोकांवर आनंदाची उधळण होणार

SCROLL FOR NEXT