Tanaav: इस्राईलच्या 'फौदा'चा भारतीय 'तणाव', काश्मीरची दाहकता दाखवणारी आगामी वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

काश्मीरची कथा घेऊन 'तणाव' ही वेबसीरीज आपल्या भेटीला येत आहे.
Tanaav
TanaavTwitter @arbaazSkhan
Published On

Tanaav Trailer Out: काश्मीरची परिस्थिती दाखवणारे अनेक चित्रपट, वेबसीरीज आणि मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला 'द काशीर फाइल्स' या चित्रपट देखील प्रचंड गाजला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट वादग्रस्त सुद्धा ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा गल्ला जमावाला होता. काश्मीरची कथा घेऊन अजून एक वेबसीरीज आपल्या भेटीला येत आहे. 'तणाव' असे या वेबसीरीजचे नाव असून नुकताच तिचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

''तणाव' ही आगामी वेबसीरीज 'सोनी लिव्ह'वरील प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर काश्मीरमध्ये घडत असलेल्या घटनांकडे आपले लक्ष वेधत आहे. तसेच तेथील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत आहे. 'तणाव' इस्रायलीमधील लोकप्रिय मालिका 'फौदा'चे अधिकृत रूपांतर आहे. (OTT)

Tanaav
Rishi Sunak Biopic: ब्रिटनच्या पंतप्रधानांचा भारतात येणार बायोपिक?, बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याचे नाव आघाडीवर

तणावचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा आणि सचिन ममता कृष्ण करत आहेत. हजारों ख्वाहिशें ऐसी, चमेली, खोया खोया चांद यांसारखे लोकप्रिय चित्रपट बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुधीरने अलीकडेच सिरीयस मेनचे दिग्दर्शन केले होते. ज्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होता.

सुधीर यांनी एका कार्यकारणात या वेबसीरीजवर काम करत असल्याचे सांगितले होते तेव्हा ते म्हणले, “चित्रपट निर्माता म्हणून, तणावाने मला विविध पात्रांचा शोध घेण्याची आणि त्यांची मानसिकता खोलवर जाऊन अभ्यासण्याची संधी दिली. मानवी भावना आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकणारी ही एक घट्ट विणलेली अॅक्शन ड्रामा असलेली खरी भारतीय कथा आहे. 'तणाव' पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रतीक्षा करू शकत नाही.”

मानव विज, अरबाज खान, सुमित कौल, रजत कपूर, शशांक अरोरा, जरीना वहाब, एकता कौल, वालुचा डी सौसा, दानिश हुसैन, सत्यदीप मिश्रा, सुखमणी सदना, साहिबा बाली, अमित गौर, अर्सलान गोनी, रॉकी रैना, एम.के. रैना, शीन दास, आर्यमन सेठ अशी मोठी स्टार कास्ट आहे.

वेबसीरीजचा अधिकृत सारांश असा आहे की, “2017 मध्ये काश्मीरच्या पार्श्वभूमीवर आधारित, तणाव एका स्पेशल युनिटची, त्यांच्या शौर्याची आणि धैर्याची कथा सांगतो. तणाव कुटुंबासह सामाजिक-राजकीय कृतीची वास्तविकता आपल्याला दाखविते. ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रदर्शित होणारी ही वेबसीरीज 'सोनी लिव्ह' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहता येणार आहे. (Web Series)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com