Rishi Sunak Biopic: ब्रिटनच्या पंतप्रधानांचा भारतात येणार बायोपिक?, बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याचे नाव आघाडीवर

ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली असून ऋषी यांच्यावर भारतातूनच नाही तर जगभरातून कौतुक होत आहे
Rishi Sunak
Rishi SunakSaam TV
Published On

Rishi Sunak Biopic: भारतीयांची खऱ्या अर्थाने या वर्षाची दिवाळी हॅप्पी झाली आहे. त्या मागील कारणे ही तशीच आहे. क्रिकेट मध्ये भारताकडून नेहमीच पाकिस्तानचा पराजय होतो. भारतीयांसाठी हा विजय खूपच आनंद देऊन जातो आणि दुसरा विजय म्हणजे भारतीय वंशाचे नागरिक आणि ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. ऋषी सुनक यांच्यावर फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Rishi Sunak
Har Har Mahadev: भैय्यासाहेबांनी चित्रपट पाहून केले आज्याचे कौतुक; म्हणतो, 'हा चित्रपट तर...'

भारतातही या विषयावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. ऋषी सुनक पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि इकडे भारतात सोशल मीडियावर अक्षयला ट्रोल केले जात आहे. त्याला मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक महागडा आणि व्यस्त कलाकार म्हणून पाहिले जाते.

Rishi Sunak
Breathe Into The Shadows 2 Trailer: क्रूरतेचा नवा अवतार घेऊन 'जे' परत येतोय... अभिषेक बच्चनची नवीन वेबसीरीज

सोशल मीडियावर याविषयीच्या अनेक ट्विटबरोबर मजेशीर मीम्सही व्हायरल होत आहेत. ऋषी सुनक यांच्या बायोपिकची चर्चाही जोर धरू लागली आहे. ऋषी सुनक यांच्या बायोपिकमध्ये अक्षयची निवड व्हावी असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 'नमस्ते लंडन' चित्रपटातील एक व्हिडिओ व्हायरल होत असून काही ब्रिटीशांना भारतीय संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल सांगत आहे. नेटकऱ्यांच्या मते अक्षय कुमार या बायोपिकसाठी उत्तम दिसेल.

Rishi Sunak
Bigg Boss Marathi 4: किरण मानेंचे थेट प्रश्न, अमृता फडणवीसांचे रोखठोक उत्तरांचा खेळ रंगणार

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जिम सराब या अभिनेत्यांचा विचार करावा अशी मागणी केली असून फक्त या चर्चा आहेत. दरम्यान ऋषी सुनक आणि आशिष नेहरा या दोघांचा चेहरा काहीसा मिळता जुळता व चेहऱ्यावरील समानता पाहता त्या दोघांवरचे मीम्स सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. ब्रिटनमध्ये जन्मलेले ऋषी सुनक भारताचे जावई आहेत. २००९ मध्ये त्यांनी इन्फोसिस या आयटी कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षताशी लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com