Aadipurush New Poster  Instagram/ @actorprabhas
मनोरंजन बातम्या

Adipurush New Poster : 'आदिपुरुष'मधील प्रभासचा नवा लूक चर्चेत; वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट

आज प्रभास ४३ वा वाढदिवस साजरा करत असून यानिमित्ताने 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी चाहत्यांना एक खास भेट दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Adipurush New Poster : गेल्या काही दिवसांपूर्वी 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर वादाच्या भोवऱ्यात सापडला होता, त्यामुळे चित्रपटावर सर्वच स्तरातून टीका होत होती. सैफ अली खानच्या भूमिकेमुळे आणि व्हिएफएक्समुळे चित्रपटाला बॉयकॉट (Boycott) करण्याची मागणी केली जात होती. प्रभासच्या वाढदिवसाच्या औचित्यावर प्रभासचा चित्रपटातील नवा लूक समोर आला आहे, त्यात तो एक आदर्श रामाच्या अवतारात दिसून येत आहे.

आज प्रभास (Prabhas) ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त मित्र, चाहते आणि कुटुंबीय त्याला शुभेच्छा देत आहेत. यानिमित्ताने 'आदिपुरुष' (Bollywood Film)च्या निर्मात्यांनी चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. २३ ऑक्टोबर रोजी वाढदिवसाच्या निमित्त हा पोस्टर सोशल मीडियावर त्याने स्वत: शेअर केला आहे. चित्रपट १२ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

प्रभासच्या 'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता, त्याची सर्वत्र चर्चा होत होती. सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असल्याचे टीझरमध्ये दिसत होते. इतकेच नाही तर 'आदिपुरुष'चे निर्माते ओम राऊत, प्रभास, सैफ अली खान यांच्यासह पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यातील पात्रांबद्दल बरेच वाद झाले आहेत. त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आली आहे.

यामध्ये सैफ अली खान रावणाच्या भूमिकेसाठी बराच ट्रोल झाला होता. सोशल मीडिया यूजर्सने त्याची खिल्ली उडवली होती. यासोबतच त्याच्या व्हीएफएक्सचीही जोरदार खिल्ली उडवली जात आहे. हे अत्यंत वाईट असल्याचे सांगितले जाते. त्याची तुलना टेम्पल रन या मोबाईल गेमशी केली होती. या टीझरला लोकांचा नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navapur : युरियाचा कृत्रिम तुटवडा; किंमतीपेक्षा अधिक दराने युरिया बॅगची विक्री, शेतकऱ्यांची होतेय अडवणूक

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? मोठ्या पदावरील युवा नेता महायुतीच्या वाटेवर

Prithvi Shaw-Sapna Gill Case: पृथ्वी शॉला मुंबई कोर्टाचा दणका; विनयभंग प्रकरणात ठोठावला दंड

Angina Symptoms: भारतीय महिलांच्या हृदय आरोग्यासाठी आवश्यक माहिती अन् प्रभावी उपाय

Nepal Protest: नेपाळमधील अस्थिरतेचा भारतावर काय होणार परिणाम? अर्थव्यवस्था अन् देशाची सुरक्षेवर संकट

SCROLL FOR NEXT