Adipurush Trailer Crossed 50 Million Views Saam TV
मनोरंजन बातम्या

Adipurush Trailer Crossed 50 Million Views: आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलर एका दिवसात मिळाले 50 मिलियन व्ह्यूज

Adipurush Trailer Released: एका दिवासात आदिपुरूष चित्रपटाच्या ट्रेलरने ५० मिलियन व्ह्युजचा टप्पा पार केला आहे.

Pooja Dange

Adipurush Trailer Is Trending On Social Media: प्रभास आणि क्रितीचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आदिपुरुष चित्रपटाचे ट्रेलर काल प्रदर्शित झाला आहे. मुंबईमध्ये चित्रपटाच्या हिंदी ट्रेलर लाँच मोठा सोहळा पार पडला. या सोहळ्या चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक उपस्थित होते.

आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात मंगल भवन अमंगल हारी या गीताने होते. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरची सर्वत्र चर्चा सुरू आहे. (Latest Entertainment News)

आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर टी सिरीजच्या ऑफिशल युट्युब चॅनल वर शेअर करण्यात आले आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एका दिवासात या चित्रपटाच्या ट्रेलरने ५० मिलियन व्ह्युजचा टप्पा पार केला आहे. २७ तासात या चित्रपटाने ५ कोटी, ३० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आदिपुरुष चित्रपाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीला चित्रपटाचा विरोध करण्यात आला होता. कलाकारांचे फर्स्ट लुक पाहून त्यांना ट्रोल करण्यात आले होते. तसेच व्हीएफक्सवर देखील प्रेक्षक नाराज होते. परंतु निर्माते आणि दिग्दर्शक यांनी संपूर्ण चित्रपटावर काम करून एक दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आदिपुरुष चित्रपट १६ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभास-क्रिती व्यतिरिक्त देवदत्त नागे आणि सनी सिंह मुख्य भूमिकेत आहेत. तर चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमधील प्रभास म्हणजे रामाला शरद केळकर यांनी आवाज दिल आहे. ज्याचे सगळीकडे कौतुक होत आहे.

आदिपुरुष चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी ट्रेलर लीक झाला होता. मात्र लगेचच कारवाई हे व्हिडिओ सोशल मीडियावरून हटविण्यात आले होते. ट्रेलरमधील काही सीन रेकॉर्ड करून त्याच्या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: शाळकरी मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, शौचासाठी घराबाहेर पडली असता अपहरण; नंतर...

Tea Taste : गोड खाल्यावर चहा अळणी का लागतो? तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण

Maharashtra Rain Live News: मराठवाड्यात ऑरेंज आणि यलो अलर्ट,नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! शेवटच्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT