Adinath Kothare Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adinath Kothare: नशिबावर सगळं सोडून दिलं...; आदिनाथ कोठारे असं का म्हणाला? पाहा व्हायरल VIDEO

Adinath Kothare Post: नॅशनल अवॉर्ड विनर फिल्ममेकर एक उत्कृष्ट निर्माता अभिनेता दिग्दर्शक आदिनाथ कोठारेने आजपासून एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. या त्याच्या प्रवासाबद्दल त्याने मत व्यक्त केलं आहे.

Shruti Vilas Kadam

Adinath Kothare Post: मराठी चित्रपटसृष्टीपासून बॉलिवुडपर्यंत आपल्या अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्याचा ठसा उमटवणारा अभिनेता आदिनाथ कोठारे आता छोट्या पडद्यावर नवा अध्याय सुरू करत आहे. नॅशनल अवॉर्ड विजेता हा अभिनेता आणि निर्माता ‘नशीबवान’ या मालिकेतून रोज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नशीबवान’ या मालिकेत आदिनाथ केवळ प्रमुख भूमिका साकारणार नाही, तर तो निर्मात्याची धुरा देखील सांभाळणार आहे. त्यामुळे या मालिकेत प्रेक्षकांना त्याचे दुहेरी योगदान अनुभवायला मिळणार आहे. मालिकेत तो ‘रूद्रप्रताप’ या भूमिकेत झळकणार असून, ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात किती घर करेल हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

नव्या प्रवासाबद्दल बोलताना आदिनाथने सोशल मीडियावर आपले मनोगत व्यक्त करत लिहीले, “आजपासून आमची मालिका तुमच्या भेटीला येतेय. आजवर माझ्या प्रत्येक कलाकृतीवर तुम्ही केलेलं प्रेम यालाही मिळेल अशी अपेक्षा आहे. कलाकार आणि निर्माता या दोन्ही नात्यांनी मनात धाकधूक आहे, पण तुमच्या आशीर्वादाने सर्व काही उत्तम पार पडेल. एक नवी पायवाट, एक नवी भूमिका… पण तुमच प्रेम कायम राहू दे बाकी सगळं नशिबावरच आहे.”

सध्या आदिनाथ बॉलिवुडमध्येही बॅक-टू-बॅक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. येणाऱ्या काळात तो ‘गांधी’, ‘रामायण’ यांसारख्या मोठ्या प्रकल्पांत झळकणार आहे. त्याचबरोबर स्वतःच्या निर्मितीतील ‘झपाटलेला 3’ आणि दिग्दर्शित चित्रपट ‘जय मल्हार’ मधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pancreatic Cancer Symptoms: पॅन्क्रियाटिक कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखा अन् तुमचा जीव वाचवा

स्मृती मानधनाला पलाश धोका देतोय? लग्न पुढे ढकलण्याचे कारण काय? फ्लर्टी चॅट्स व्हायरल

Famous Director : प्रसिद्ध डायरेक्टरची मोठी गुंतवणूक; पॉश एरियात ५ प्रापर्टी केल्या खरेदी, किती कोटींमध्ये झाली डील?

Maharashtra Live News Update : अयोध्येत ध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात

PF चे पैसे ATM मधून काढता येणार; कधीपासून सुरु होणार EPFO 3.0? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT