Rakhi Sawant And Adil Khan Durrani New Allegation Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: राखीने आदिलच्या आरोपांची केली पोलखोल, माध्यमांसमोरच वाचली आरोपांची भली मोठी यादी

राखी सावंतने खुलासा करताना आदिलचे आणखी एक गुपित उघड केले आहे.

Chetan Bodke

Rakhi Sawant Viral News: आदिल खान आणि बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत या दोघांमधील वाद खासगी राहिला नसून एक चर्चेचा मुद्दा बनला आहे. न्यायालयासमोर राखी कधी आदिलसाठी धायमोकलून रडते तर कधी त्याच्यावर आरोपांच्या फैरी झाडते. आता पुन्हा एक राखीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

राखी सावंतने खुलासा करताना आदिलचे आणखी एक गुपित उघड केले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राखी म्हणते, "अंधेरी कोर्टातून मला न्याय मिळाला नाही तर मी उच्च किंवा सत्र न्यायालयात जाईल. आदिलवर आरोप करणाऱ्या त्या महिलेने मला नुकते काही ऑडियो पाठवल्या आहेत. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आदिलने मला सोडून जाण्याचा प्लॅन खूप आधी केला होता. इतकंच नाही तर मला मारण्याचा प्लॅनही केला होता."

यापूर्वी अनेकदा आदिलने तिच्याकडून पैसे घेतल्याचे ही सांगितले आहे. तिच्याकडून तिच्या घराची चावी हिसकावून घेतली होती. यानंतर राखीने आदिलविरोधात पोलिसात एफआयआर दाखल केली होती. राखी सावंतच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत आदिल खान दुर्राणीला ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत न्यायालयाने आदिल खानला जामीन मंजूर केलेला नाही.

यासोबत राखीने पुढे सांगितले की, 'मी आज सकाळीच प्रार्थना करत होते. नमाज अदा केल्यानंतर मी देवासमोर प्रार्थना केली की, आदिलला एवढा धार्मिक कर की तो सुधारायला हवा. त्याला इतके पवित्र कर की, त्याच्या जीवनातील काही किस्स्यांमुळे त्याला पश्चाताप होईल. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही मुलीसोबत तो क्रूर कृत्य करु नये.'

राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. फसवणूक व मारहाण केल्याबरोबरच मानसिक, शारीरिक छळ केल्याचा आरोप राखीने केला आहे. याबरोबरच पैसे व दागिने घेतल्याचा आणि अश्लील व्हिडीओ बनवल्याचंही राखी म्हणाली होती. तुरुंगात भेटायला गेलेल्या पतीने राखीला धमकी दिली असल्याचंही तिने सांगितलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार खांडबारा रस्त्यावर बस आणि कारचा अपघात

नग्न केलं अन् काळंनिळं होईपर्यंत मारलं; हॉटेल मालकाचं मॅनेजरसोबत भयंकर कृत्य, सोलापूर हादरलं

मुंबईच्या महापौरपदावर कोण? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले|VIDEO

Bhagar Thalipeeth: उपवासाला बनवा भगरीचे खमंग थालीपीठ; ५ मिनिटांत होतील तयार

Winter Hair Care : हिवाळ्यात कोंडा झालाय? करा हे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT