'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi hasyajatra) या विनोदी कार्यक्रमातून (Comedy show) प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री विशाखा सुभेदारला (v) स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्काराने (Stree Shakti National Award ) सन्मानित करण्यात आले आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशाखा सुभेदार शिवाय इतर अभिनेत्री आणि क्रीडा क्षेत्रातील महिला खेळाडू आणि गायिकांनाही गौरविण्यात आले आहे. (Actress Visakha Subhedar honored with Stree Shakti National Award)
पुण्यातील सूर्यदत्त समूह शिक्षण संस्थेतर्फे राजभवनात एका कार्यक्रमात सूर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले. विशाखाने फेसबुकवर याविषयी पोस्ट करत आपल्या सर्व सहकाऱ्यांचे, सहकलाकारांचे आणि परिवाराचे आभार मानले आहेत.
दरम्यान या कार्यक्रमात यात अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela), निशिगंधा वाड (Nishigandha Wad), धावपटू कविता राऊत (Kavita raut), पार्श्वगायिका पलक मुचाल (Palak Muchal) यांच्यासह इतर ११ गुणवंत महिलांना राजभवनात आयोजित एका कार्यक्रमात स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘’ मातृत्व म्हणजे केवळ आई होऊन बाळाला जन्म देणे नाही, तर मातृत्व म्हणजे सहनशीलता, प्रेम व कारुण्यभावआहे. मनुष्य कितीही यशस्वी झाला , संपन्न झाला व यशवंत झाला तरीही सुख-दुःख प्रसंगी त्याला आईचीच आठवण येते. माता, मातृभाषा व मातृभूमीचे स्मरण ठेवल्यास प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात अधिक प्रगती करता येईल, अशा भावना भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.
Edited By- Anuradha Dhawade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.