‘या’ देशात महिलांना मिळणार एका पेक्षा जास्त लग्न करण्याचा अधिकार

विशेष म्हणजे त्यासाठी एक नवीन विवाह कायदा देखील तयार करण्यात येणार आहे.
‘या’ देशात महिलांना मिळणार एका पेक्षा जास्त लग्न करण्याचा अधिकार
‘या’ देशात महिलांना मिळणार एका पेक्षा जास्त लग्न करण्याचा अधिकारSaam tv

प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका : ज्याप्रमाणे कोणत्याही कायद्याशिवाय जगभरात पुरुषांना एका पेक्षा अधिक लग्न करण्याची परवानगी दिली जाते, त्याप्रमाणे आता दक्षिण आफ्रिकेतही (Dakshin Africa) लवकरच महिलांनाही (Women) एकापेक्षा अधिक पुरुषांशी (Jents) लग्न करण्याचा अधिकार मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील गृह मंत्रालयाने (Home Minister) याबाबत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी एक नवीन विवाह कायदा देखील तयार करण्यात येणार आहे. तसेच या कायद्याद्वारे विवाहाची संकल्पना अधिक समावेशक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. (In this country, women will have the right to polygamy)

‘या’ देशात महिलांना मिळणार एका पेक्षा जास्त लग्न करण्याचा अधिकार
कोरोना संकटात मजुरांना मोफत धान्य द्या - हाय कोर्टाचे केंद्राला आदेश... (पहा व्हिडिओ)

या आठवड्यात विवाहासंबंधी प्रसिद्ध झालेल्या ग्रीन पेपर ऑन मॅरेजच्या (Green Paper on Marriage) धोरणानुसार, सध्याचा विवाह कायदा हा भेदभाव करणारा असून तो समानतेला चालना देत नाही. याचे कारण म्हणजे सध्याचा कायदा हा हिंदू, यहुदी, मुस्लिम आणि रास्ताफेरियन विवाहांना मान्यता देत नाही. तसेच, बहू अपत्यांसाठी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी, असेही या विवाहासंबंधी दस्ताऐवजात म्हटले आहे.

त्याचबरोबर या प्रस्तावाचा मसुदा तयार करण्यापूर्वी अनेक मानवी हक्क कार्यकर्त्यांचा आणि इतर गटांशी मुख्य विषयावर सल्ला घेण्यात आला आहे. य़ातही अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यानी मागणी समानतेची मागणी करत माहिलांना एकापेक्षा जास्त विवाह करण्याचा अधिकार मिळावा,यासाठी ही मागणी केली आहे.

मात्र, दुसरीकडे, पुराणमतवादी आणि काही धार्मिक गटांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. पुरुषांनी समलिंगी विवाह आणि बहुविवाह करण्याची परवानगी दक्षिण आफ्रिकेने दिली असूनही अनेकांनी बहुविवाहाला विरोध केला आहे. तसेच हा कायदा ‘आफ्रिकन संस्कृती नष्ट करेल, असे मतही व्यक्त केले आहे.

त्याचबरोबर, द इंडिपेंडेंटला दिलेल्या अहवालानुसार, संबंधित प्रस्तावित कायदा लागू केल्यास म्हणजेच समान वैवाहिक हक्क माहिलांपर्यंत वाढविल्यास हा कायदा समाज नष्ट’ ​​करेल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते आफ्रिकन ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्षाचे (एसीडीपी) केनेथ मेशो यांनी दिली आहे.

‘या’ देशात महिलांना मिळणार एका पेक्षा जास्त लग्न करण्याचा अधिकार
उत्तर प्रदेशमधील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाचे बीड कनेक्शन

मात्र, “यामुळे आफ्रिकन संस्कृती नष्ट होईल. अशा लोकांच्या मुलांचे काय? त्यांची ओळख कशी होईल? स्त्री आता पुरुषाची भूमिका घेऊ शकत नाही. याबाबत ऐकायलाही कसे वाटते. स्त्री आता पुरुषासाठी लोबोला [वधूची किंमत] देईल का? पुरुषाने महिलेचे आडनाव लावावे अशी अपेक्षा आहे का? ” अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रकेतील व्यावसायिक आणि सोशल मिडीयावर प्रसिद्ध असलेले आणि स्वत:ला चार पत्नी असलेल्या मेसेकु यांनी दिली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com