Vidya Balan On Smoking Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vidya Balan On Smoking : सिगारेटच्या व्यसनाबद्दल काय म्हणाली विद्या बालन? खासगी आयुष्याबाबत केला विचित्र खुलासा

Vidya Balan Interview : एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने व्यसनाबद्दल भाष्य केलेलं आहे.

Chetan Bodke

Vidya Balan On Smoking

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा नुकताच ‘दो और दो प्यार’ चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटामुळे कमालीची प्रकाशझोतात आली आहे. नुकतंच अभिनेत्रीने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने व्यसनाबद्दल भाष्य केलेलं आहे. तिने मुलाखतीमध्ये, ‘द डर्टी पिक्चर’ची शुटींग संपल्यानंतर सिगारेट पिण्याची सवय लागल्याचे सांगितले.

विद्या बालनचा ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट कमालीचा चर्चेत आला होता. चित्रपटामध्ये तिने दिवंगत अभिनेत्री सिल्क स्मिता यांची भूमिका साकारली होती. भूमिका साकारण्यासाठी विद्याने चित्रपटामध्ये, सिगारेट ओढली होती. पण तिला तिच्या रियल लाईफमध्येही सिगारेट ओढण्याची सवय लागली. याबद्दल तिने मुलाखतीमध्ये भाष्य केले, "मला वाटत नाही की मी हे कॅमेऱ्यासमोर बोलावे, पण मला सिगारेटच्या धुराचा वास खूप आवडतो. सिगारेट ओढल्याने जर शरीराला कोणतीही हानी झाली नसती तर मी सिगारेट ओढली असती."

पुढे मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली, "कॉलेजमध्ये असताना मी बस स्टॉपवर स्मोकिंग करणाऱ्या लोकांच्या शेजारी बसायचे आणि सिगारेटच्या धुराचा वास घ्यायचे. मला सिगारेटच्या धुराचा वास खूप आवडायचा. ‘द डर्टी पिक्चर’नंतर मला स्मोकिंगची प्रचंड सवय लागली होती. मी दिवसाला २ ते ३ सिगारेट ओढायचे. शुटिंगच्या आधी मला सिगारेट कशी ओढायची हे माहित होतं. पण मी प्रत्यक्षात कधी स्मोकिंग केली होती. काही भूमिका अशा असतात ज्यामध्ये तुम्ही खोटा अभिनय करु शकत नाही. म्हणून मी भूमिकेसाठी सिगारेट प्यायले होते." (Vidya Balan)

पुढे मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली, "सुरुवातीला माझ्या मनात असहजता होती, कारण सिगारेट पिणाऱ्या मुलींबद्दल लोकांनी त्यांच्या मनात एक धारणा तयार केली होती. पण आता कोणी पूर्वीसारखं जज करत नाही." "तू कधी गुटखा खाल्लायस का?", असाही प्रश्न विद्याला मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर विद्याने "अजिबात नाही" असं दिलं. (Bollywood News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

SCROLL FOR NEXT