Actress Threads Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Threads: '१० मुलं घेऊन येईन…'; प्रसिद्ध अभिनेत्रीला बलात्काराची धमकी, भावाच्या चाहत्यांवर गंभीर आरोप

Actress Threads: दिव्या अग्रवालने अलीकडेच दावा केला आहे की तिला प्रिन्स नरुलाच्या चाहत्यांकडून सतत बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत. आता, प्रिन्स नरुलाने देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Shruti Vilas Kadam

Actress Threads: 'द ५०' दरम्यान दिव्या अग्रवाल सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. शो दरम्यान, तिची सह-स्पर्धक भव्या सिंगने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केले, ज्यात तिने सांगितले की ती अभिनेत्री तिचा पती अपूर्वा पाडगावकरपासून बराच काळ वेगळी राहिली आहे. दिव्याच्या टीमने या दाव्यांना उत्तर देत अभिनेत्रीवर टीका करणारी एक पोस्ट शेअर केली. आता, दिव्या अग्रवाल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच, दिव्याने प्रिन्स नरुलाच्या चाहत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीने दावा केला आहे की प्रिन्सचे चाहते तिला सतत बलात्काराच्या धमक्या पाठवत होते. हे प्रकरण 'द ५०' दरम्यान प्रिन्स नरुलाशी झालेल्या वादानंतर सुरू झाले. आता, प्रिन्स नरुलानेही दिव्या अग्रवालच्या या आरोपांवर उत्तर दिले आहे.

दिव्या अग्रवालचे आरोप

१० मार्च रोजी, दिव्या अग्रवालने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तिने तिचा 'एक्स भाऊ' प्रिन्स नरुलाच्या चाहत्यांना टार्गेट केले होते. अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "अलीकडेच, प्रिन्स नरुलाच्या चाहत्यांकडून मला खूप द्वेष मिळत आहे. मला बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत. माझा द्वेष करणं ही समस्या नाही तर बलात्काराच्या धमक्या ते वाईट आहेत. आम्हाला माहिती आहे की तुम्ही कुठे राहता... १० मुलं घेऊन येईन... ते तुमच्यावर बलात्कार करतील, व्हिडिओ बनवतील. तु याचं लायकीची आहेस अशा धमक्या मला येत आहेत.

प्रिन्स नरुला दिव्यावर टीका करतो

प्रिन्स नरुलानेही दिव्याला उत्तर दिले. त्याने द ५० च्या एका एपिसोडमधील एक क्लिप शेअर केली. व्हिडिओमध्ये, दिव्या त्याला अडवताना दिसत आहे. प्रिन्सने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की त्याने कधीही खेळादरम्यान कोणालाही त्याला फॉलो करण्यास भाग पाडले नाही. या क्लिपमध्ये सपना चौधरी देखील संपूर्ण परिस्थितीवर चर्चा करताना दिसत आहे. सपनाच्या म्हणण्यानुसार, प्रिन्सने एकदा तिला एका स्पर्धकाविरुद्ध मतदान करण्याचा सल्ला दिला होता, परंतु जेव्हा तिने नकार दिला तेव्हा त्याने तिच्यावर दबाव आणला नाही.

सध्या द ५० शोमध्ये

करण पटेल, उर्वशी ढोलकिया, रिधी डोगरा, प्रिन्स नरुला, शिव ठाकरे, दिव्या अग्रवाल, मल्लिका शेरावत, जय भानुशाली, विवियन डीसेना, कृष्णा श्रॉफ, फैसल शेख (मिस्टर फैजू), मोनालिसा, चाहत पांडे, नीलम गिरी, हमीद बरकझी, लवकेश कटारिया, सिवेत तोमर, मॅक्सटर्न (सागर ठाकूर), सुमैरा शेख, नेहल चुडासमा आदी कलाकार असून हा शो सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.

Maharashtra News Live Update: माणगावमध्ये सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता

Firecracker Insurance : फक्त १० रुपयांत इन्शुरन्स! दिवाळीत फटाक्यांमुळे अपघात झाल्यास मिळणार आर्थिक मदत

ग्रामपंचायतीत प्रशासकीय भूकंप! २ ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित; ग्रामपंचायतीचे दप्तर अद्ययावत न ठेवल्याचा ठपका

'रडीचा डाव' खेळणं बंद करा! गोकुळवरून राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; म्हणाले, "आता विरोधकांचा काळ..."

Roasted Garlic Benefits: रोज सकाळी उठल्यावर खा भाजलेला लसूण; रक्तवाहिन्यांच्या कोपऱ्यातूनही साफ होईल घाणेरडं साचलेलं कोलेस्ट्रॉल

SCROLL FOR NEXT