Suparna Shyam in Oot Marathi movie google
मनोरंजन बातम्या

Suparna Shyam: सुपर्णा श्याम ‘ऊत’ चित्रपटात कणखर भूमिकेत झळकणार, ‘दुहेरी’नंतर नवा जबरदस्त अंदाज

Oot Movie: सुपर्णा श्याम लवकरच 'ऊत' या मराठी चित्रपटात ‘गुलाब’ या कणखर गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. वेरा फिल्म्स निर्मित हा चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

छोट्या पडद्यावरील ‘दुहेरी’ या मालिकेतून अल्पावधीत घराघरांत सुपरिचित झालेली अभिनेत्री सुपर्णा श्याम लवकरच 'ऊत’ या आगामी मराठी चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. सुपर्णा ‘ऊत’ या चित्रपटात ‘गुलाब’ या कणखर मध्यमवर्गीय गृहिणीच्या व्यतिरेखेत दिसणार आहे. स्वतंत्र विचारसरणीच्या गुलाबाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवताना ‘प्रेम’ व ‘लग्न’ या दोन्ही गोष्टी ती कशारीतेने हाताळते हे पहायला मिळणार आहे. वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित 'ऊत' हा मराठी चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना सुपर्णा सांगते, ‘या भूमिकेने मला खूप चांगला अनुभव दिला. प्रेमाला जिंकत आपण ते कसं निभावतो? याची कथा दाखवताना प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन ही ‘ऊत’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

सुपर्णा सोबत राज मिसाळ, आर्या सावे ही नवी जोडी या चित्रपटात दिसणार आहे. राजकुमार तांगडे, अनिकेत केळकर, प्राजक्ता केळकर, पुरषोत्तम वाघ, शैलेश कोरडे, अर्चना रावल, दीपक पाटील, वैदही ठाकूर, सिद्धेश्वर थोरात, अभय कुलकर्णी, श्रेया देशमुख, धनश्री साटम आदि कलाकारांच्या सुद्धा यात भूमिका आहेत. 'ऊत' चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OnePlus 15 Smartphone: जबरदस्त फीचर्स अन् कॅमेरासह One Plus 15 लाँच; किंमत किती?

Kisan Vikas Patra: पैसे डबल करणारी योजना! ११५ महिन्यात ५ लाखांचे होणार १० लाख; जाणून घ्या

ऐन निवडणुकीत अजित दादांच्या गटात धुसफूस, आमदाराची 'मुंडेंना पाठवू नकाच', अशी मागणी; कारण काय?

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Smriti Mandhana Haldi : हळदीत रंगले स्मृती-पलाश; टीम इंडिया बेभान होऊन नाचली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT