Sonalee Kulkarni Visit At Jinji Fort Instagram
मनोरंजन बातम्या

Sonalee Kulkarni Visit At Jinji Fort: कपाळी चंद्रकोर अन् नऊवारी नेसून अप्सरेने सर केला ८०० फूट उंच किल्ला, राज्याभिषेक दिनानिमित्त अभिनेत्री पोहोचली किल्ल्यावर

Sonalee Kulkarni New Film Promotion: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या स्वराज्याभिषेक दिनी सोनालीने नऊवारी नेसून महाराजांच्या तिसऱ्या राजधानीवर पोहोचली. ८०० फूट उंचावरून तिनं महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून दिली.

Chetan Bodke

Sonalee Kulkarni Viral Video: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोनाली आणि पती कुणाल बेनोडेकर तर्की देशात सुट्टीचा आनंद लुटत होते. तुर्कीमधील धम्माल मस्ती करतानाचे फोटो ती सातत्यानं शेअर करत होती. तिथून आता ती भारतात परतली असून लगेचच आगामी चित्रपटाच्या प्रमोशनकरिता तिने सुरूवात केली आहे. ‘मोगलमर्दानी छत्रपती ताराराणी’ हा सोनालीचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

परदेशातून भारतात येताच सोनालीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या राजधानी स्थळाला भेट दिली आहे. ६ जून १६८४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला होता. याचे निमित्त साधत ३५० व्या राज्याभिषेकाच्या दिनी सोनालीने जिंजी किल्ल्याची सैर केली आहे. नुकताच सोनालीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून तिचा हा चाहत्यांना माहितीदेणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ‘मोगलमर्दानी छत्रपती ताराराणी’ चित्रपटात सोनाली स्वत: छत्रपती ताराराणीच्या भूमिकेत दिसली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. तिने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली असून तिचा लूक देखील सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. सोनाली यापूर्वी ही अनेकदा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पारंपारिक साडी पारिधान करून हजेरी लावली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची चर्चा होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड तर तिसरी राजधानी जिंजी ही आहे. महाराजांची तिसरी राजधानी असलेला हा किल्ला तामिळनाडू येथे असून तिने ही भेट राज्याभिषेक दिनाचे निमित्त साधत तिने जिंजी किल्ल्याला भेट दिली होती.

प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे क्रिएटिव्ह व्हाईब आणि समीर अरोरा हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे असून या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार अवधुत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे. दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दानी महाराणी ताराराणी’ या ग्रंथावर आधारित ‘मोगलमर्दानी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT