Smita Gondkar On Besharam Rang Controversy Instagram @smita.gondkar
मनोरंजन बातम्या

Besharam Rang Controversy: दीपिकाच्या 'बेशरम रंग' गाण्याच्या वादावर स्मिता गोंदकर म्हणाली, 'आता भगव्या रंगाची ब्रा...

भगव्या रंगाच्या बिकिनीवर मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने प्रतिक्रिया दिली आहे.

Pooja Dange

Smita Gondkar On Besharam Rang Controversy: पठान चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून एका वादाला तोंड फुटले होते. हा वाद होता दीपिका पदुकोण हिच्या भगव्या रंगाच्या बिकिनीचा. दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हणत जात होत. यामुळे राजकीय पक्ष, हिंदू संघटनानी या गाण्याच्या आणि चित्रपटाच्या विरोधात टीका आणि आंदोलने केली. आता या भगव्या रंगाच्या बिकिनीवर मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत स्मिता गोंदकर ही अशी अभिनेत्री आहे जिला अनेकदा आपण बिकिनीमध्ये पहिले आहे. आता अभिनेत्रीने बिकिनीवर प्रतिक्रिया दिली आहे. सकाळ माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत स्मिता गोंदकर दीपिकाच्या बिकिनीवर भाष्य केले आहे. (Actress)

दरम्यान स्मिता म्हणाली की, "हा जो काही रंगाचा वाद सुरु आहे त्याने मला खरंच भीती वाटू लागली आहे. मी तर पहिल्यांदा माझं वॉर्डरोब चेक केलं आणि त्यात माझ्याकडील बिकिनी कलेक्शनमध्ये भगव्या रंगाचे काही नाही ना हे आधी पाहिलं. आता तर भगव्या रंगाची ब्रा घालण्याचे देखील दडपण येईल. चुकून कुठे कुणाच्या नजरेस पडली तर आपलं काय करतील हे लोक याचा विचारही करून भिती वाटतेय''. (Celebrity)

"ज्या भगव्या रंगावरनं वाद सुरु केलाय, हिंदू धर्माचा पवित्र रंग म्हणून बोललं जात आहे मग याबाबतीत मी दीपिकाला सल्ला देईन की तिनं सरळ हिरव्या रंगाच्या हॉट बिकिनीत स्वतःचा फोटो पोस्ट करावा म्हणजे प्रश्नच मिटेल."

"खरंतर आता जग पुढे चाललंय. ग्लोबलायझेनमुळे पाश्चात्य संस्कृतीचा पगडा वाढतोय,पण त्याहूनही अधिक आता आपण हवामान बदलतं तसे कपडेही घालतो. मग हा तर सिनेमा आहे...जागतिक स्तरावर तो पाहिला जातो. आणि सिनेमातील प्रसंगाची गरज ओळखून कलाकारांना कपडे घालावे लागतात. आणि जर ते सुंदर दिसत असतील तर का घालू नयेत. कुठे ते चांगले दिसले नसते तर प्रश्न वेगळा होता. पण उगाचच दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरनं जो वाद सुरु आहे तो मला काही पटलेला नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT