Kaikala Satyanarayana: तेलुगू चित्रपटसृष्टीतील खलनायक हरपला, कैकला सत्यनारायण यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

कैकला यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
Kaikala Satyanarayana
Kaikala SatyanarayanaSaam Tv
Published On

Kaikala Satyanarayana Passes Away: तेलुगू चित्रपटसृष्टीतील चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे निधन झाले आहे. कैकला सत्यनारायण दीर्घकाळापासून वयोमानाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. कैकला यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. कैकला सत्यनारायण यांच्यावर बराच काळ रुग्णालयात उपचार सुरू होते. कैकला सत्यनारायण यांनी आज सकाळी (२३ डिसेंबर, २०२२) जगाचा निरोप घेतला.

कैकला सत्यनारायण यांच्या कुटुंबावर यावेळी दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कैकला हे तेलगू चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. त्यांचा चाहता वर्ग सुद्धा तितकाच मोढ आहे. ही बातमी समजल्यानंतर चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत चाहते कैकला सत्यनारायण यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. तसेच त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करत आहे. (Social Media)

Kaikala Satyanarayana
Sunny Leone : सनीच्या रिप्लायमुळे तरुणाने सोडली सिगारेट, पाहा सविस्तर बातमी | SAAM TV

कैकला यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे तर त्यांनी 10 एप्रिल 1960 रोजी नागेश्वरम्मा यांच्याशी विवाह केला. कैकला यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. कैकला यांनी त्यांच्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत 750 चित्रपटांमध्ये काम केले. कैकला सत्यनारायण हे दिग्गज अभिनेते एनटी रामाराव यांच्या खूप जवळ होते. (Actor)

अभिनयासोबतच कैकला राजकारणात सुद्धा सक्रिय होते. कैकला यांनी अगदी लहान वयातच अभिनय क्षेत्रातील त्यांचा प्रवास सुरू केला होता. त्यांच्या अभिनयाची पहिली दखल डीएल नारायण यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी कैकला यांना १९५९ मध्ये 'सिपाही कुथुरु' या चित्रपटात भूमिका ऑफर केली.

मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करू शकला नाही. पण कैकला सत्यनारायणाच्या अभिनयाने सर्वांना त्यांची दाखल घ्यायला भाग पडले. कैकला सत्यनारायण यांचा अभिनय पाहून त्यांची तुलना एनटीआरशी करण्यात आली. कैकला यांनी एनटीआर यांच्या चित्रपटांमध्ये सर्व प्रकारची पात्रे साकारली आहेत. खलनायक म्हणून कैकला यांना सगळीकडेचपसंती मिळवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com