Actress Simran Budharup On lalbaugcha Raja Darshan Saamtv
मनोरंजन बातम्या

Simran Budharup News: मोबाईल हिसकावला, धक्काबुक्की केली, लालबाग राजाच्या दरबारात अभिनेत्रीशी गैरवर्तन; VIDEO

Gangappa Pujari

Actress Pushed by Bouncer In lalbaugcha Raja: मुंबई, पुण्यासह राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. देशभरातील गणेश भक्तांसह सिनेसृष्टीतील कलाकार, राजकी नेते मंडळी मुंबईमधील लालबागच्या राजाच्या दर्शनाला गर्दी करत आहेत. अशातच हिंदी टेलिव्हिजनवरील कुमकुम भाग्य तसेच पांड्या स्टोर मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री सिमरन बुधरुप लालबागच्या राजाच्या दर्शनाला आली असता सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिनेत्रीने स्वतः इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे.

नेमकं काय घडलं?

‘कुमकुम भाग्य’ आणि ‘पांड्या स्टोअर’ अभिनेत्री सिमरन बुधरूप नुकतीच आपल्या आईसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. भेटायला गेली होती. यावेळी मंडळाच्या महिला कर्मचारी आणि बाऊन्सर्सने गैरवर्तन केल्याचे सांगत अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. यावेळी झालेल्या धक्काबुकीचा व्हिडिओही सिमरनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या व्हायरल होत असून चाहतेही संताप व्यक्त करत आहेत

अभिनेत्री गुरुवारी तिच्याआईसोबत लालबागचा दर्शनासाठी गेली होती. दर्शनरांगेत सिमरनचा नंबर येताच तिच्या मागे उभ्या असलेल्या तिच्या आईने एक फोटो क्लिक केला. हे पाहून एका कर्मचाऱ्याने अचानक तिच्या आईचा फोन हिसकावून घेतला. सिमरनच्या आईने तिचा फोन परत घेण्याचा प्रयत्न केला असता तिला बाजूला ढकलण्यात आले. हे पाहून सिमरनने मध्यस्थी केली, मात्र त्यानंतर बाऊन्सर्सने तिच्याशी असभ्य वर्तन केले. सिमरनने पुढे सांगितले की, जेव्हा तिने घटनेचे रेकॉर्डिंग सुरू केले तेव्हा कर्मचाऱ्यांनी तिचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला.

अभिनेत्रीने या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये सिमरनची आई आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाल्याचे दिसत आहे. यावेळी मध्यस्थी केल्यानंतर अभिनेत्री आणि महिला सुरक्षा रक्षकांमध्येही वाद झाला. अभिनेत्रीने आपला हा अनुभव सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला करत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. भक्त सकारात्मकता आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि गैरवर्तनाची अपेक्षा न करण्याच्या हेतूने देवदर्शनला येतात. गर्दी असल्यामुळे व्यवस्थापन करणे कठीण होत असेल मात्र आलेल्या भक्तांना अशी वागणूक देणे, चुकीचे आहे, हे अपेक्षित नाही, असे अभिनेत्रीने म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT