Shubhangi Atre Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shubhangi Atre: 'भाभी जी घर पर हैं' फेम शुभांगी अत्रेच्या घरी पसरली शोककळा; 'या' जिवलगाचा झाला मृत्यू !

Actress Shubhangi Atre: भाभी जी घर पर हैं फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेच्या घरी पसरली शोककळा आहे. भाभी जी घर पर हैं चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिच्या निकटवर्तीयचे दुःखद निधन झाले आहे.

Shruti Vilas Kadam

Actress Shubhangi Atre: 'भाभी जी घर पर हैं' मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रेचा पूर्व पती पियूष पूरेचे १९ एप्रिल २०२५ रोजी लिव्हर सिरॉसिसमुळे निधन झाले. त्याचा इंदौरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पियूष काही काळापासून या आजाराशी झुंज देत होता. या दु:खद घटनेने शुभांगी आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.​

शुभांगी अत्रे आणि पियूष पूरे यांचे २००३ मध्ये इंदौरमध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना एक कन्यारत्न झाले. मात्र, वैवाहिक जीवनात मतभेद निर्माण झाल्यामुळे दोघांनी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही शुभांगीने पियूष यांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.​

पियूष पूरे यांच्या निधनानंतर शुभांगी अत्रेने माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. तिने सांगितले की, "आमच्या वैवाहिक नात्यातील अडचणी असूनही, पियूषने माझ्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मला खूप पाठिंबा दिला होता. त्याच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. या कठीण काळात मला आणि माझ्या कुटुंबाला एकट राहू द्या.

शुभांगी अत्रे सध्या 'भाभी जी घर पर हैं' या मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारत आहेत. या दु:खद प्रसंगानंतरही तिने शूटिंग सुरू ठेवले आहे, मात्र आता ती अधिक काळ तिच्या मुलीसोबत वेळ घालवणार आहे. पियूष पूरे यांच्या निधनाने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.​

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? सर्वोच्च सुनावणीला सुरूवात

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला छावा संघटनेचा पाठिंबा

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा निर्णय, इतक्या दिवस मनाई आदेश लागू; अटी कोणत्या?

SCROLL FOR NEXT