Seema Deo Funeral Saam Tv
मनोरंजन बातम्या

Seema Deo Funeral: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव अनंतात विलिन, आईला मुखाग्नी देताना मुलांना अश्रू अनावर

Seema Deo News: कुटुंबीय, चित्रपटसृष्टीतील काही कलाकार, तसेच सर्व चाहत्यांच्या उपस्थितीत सीमा देव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Seema Deo Funeral


मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची वयाच्या ८१ व्या वर्षी गुरूवारी सकाळी मुंबईमध्ये प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सीमा यांच्यावर गुरूवारी सायंकाळी दादरच्या शिवाजी पार्कात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सीमा देव आपल्या अनेक आठवणी मागे सोडून अनंतात विलीन झाल्या. यावेळी त्यांचे कुटुंबीय, चित्रपटसृष्टीतील काही कलाकार, तसेच सर्व चाहत्यांच्या उपस्थितीत सीमा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीमा यांच्या सिनेकारकिर्दितील अनेक भूमिका आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. २०२० मध्ये सीमा देव यांना अल्झायमर्स या आजाराचे निदान झाले होते. त्यावेळी त्यांच्या मुलाने अर्थात अभिनेते अजिंक्य देव यांनी ट्वीट करुन सीमा यांच्या आरोग्याविषयी माहिती दिली होती. गुरूवारी सकाळी सीमा देव यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Actress)

सीमा यांनी त्यांच्या सिनेकारकिर्दीत अनेक यशस्वी आणि हिट चित्रपट मराठीसह हिंदी सिनेसृष्टीला दिले आहेत. एकूण ८० चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिलाय. सीमा यांचे पती रमेश देव यांनी देखील मनोरंजन विश्वात उल्लेखनीय कामगीरी केली आहे. १९६० मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिया बीबी राजी’ हा सीमा यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली. अनेक मराठी चित्रपटांमुळे सीमा यांना महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्धी मिळाली.

“गेल्या वर्षी बाबा गेले, आता आई गेली. अवघ्या महाराष्ट्राने आमच्या कुटुंबाला भरभरून प्रेम दिलं. तुमच्या सर्वांचे प्रेम आणि आशिर्वाद आम्हा सर्वांवर असेच राहुद्या. सोबतच तुमचे प्रेम आमच्यावर कायम राहुद्या. त्या दोघांनी नेहमीच तुमचं मनोरंजन केलं, आता आम्हीही तेच करतोय, आम्ही जसे आई-वडीलांनी तुमचे मनोरंजन केले, आता तसेच आम्हीही तुमचे मनोरंजन करण्यासाठी प्रयत्न करू. तुमचं प्रेम त्यांच्या प्रमाणेच आम्हालाही लाभो...” अशी अजिंक्य देव यांनी प्रतिक्रिया दिली. (Entertainment News)

सीमा देव यांच्या अंत्यसंस्कारावेळी अभिनेते अजिंक्य देव आणि त्यांचा भाऊ अभिनय देव दोघेही भावूक झाले होते. आईच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अभिनेते अजिंक्य देव यांनी दिली आहे. सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ असं होतं. त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांची खरी ओळख ‘सीमा देव’ या नावानेच झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फिटनेस-कॅलरी बर्नसाठी घरातच करा 10,000 स्टेप्स वर्कआऊट; जाणून घ्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला

Wednesday Horoscope : गुप्त शत्रूंचा त्रास वाढणार, पैशांबाबत घ्यावी लागणार काळजी; 5 राशींच्या लोकांनी जपून राहा

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जुन्नरमधील बिबट्या शिफ्ट करणार

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

Pune News : सूर्योदयापूर्वी अवैध धंदे तोडून टाका; पुणे पोलीस आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

SCROLL FOR NEXT