'OTT'वर Uncut प्रदर्शित होणार OMG 2; संतापलेल्या निर्मात्यांचा मोठा निर्णय

OMG 2 OTT Released: चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे.
OMG 2 OTT Released
OMG 2 OTT ReleasedSaam Tv
Published On

OMG 2 Release Date:

'ओ माय गॉड 2' चित्रपट अनेक वादांनंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सेन्सॉर बोर्डाने 27 बदलांनंतर अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या सेक्स एज्युकेशनवर आधारित असलेल्या चित्रपटाला 'A' प्रमाणपत्र दिले. UAE सारख्या देशांना 12+ प्रमाणपत्रांसह नो कट रिलीझ मिळालं.

गेल्या 13 दिवसांत 'OMG 2' ने देशातील बॉक्स ऑफिसवर 123.72 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सेन्सॉर बोर्डाने लहान मुलांसाठी एवढा महत्त्वाचा चित्रपट 'अडल्ट' कसा ठरवला, असा प्रश्न चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण विचारात आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांनीही याबाबत सेन्सॉर बोर्डावर टीका केली आहे. पण आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल एक चांगली बातमी येत आहे.

OMG 2 OTT Released
National Film Awards 2023: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; अल्लू अर्जुन, आलियाचा 'जलवा', विजेत्यांची यादी वाचा

'OMG 2' दिग्दर्शक अमित राय चित्रपटात करण्यात आलेले 27 बदल आणि A सर्टिफिकेटमुळे प्रचंड संतापले आहेत. त्यांनी म्हटले आहे, 'आम्ही हा चित्रपट सर्व वर्गातील प्रेक्षकांसाठी बनवल्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटले. आम्ही त्यांच्याकडे U/A प्रमाणपत्रासाठी भिक मागितली जेणेकरून मुले देखील चित्रपट पाहू शकतील. पण सेन्सॉर बोर्डाने तसे केले नाही. आम्ही त्यांचे मन वळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण नंतर दोन डझनहून अधिक बदल करून चित्रपट प्रदर्शित करावा लागला.

'पीटीआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमित राय म्हणाले, 'प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रेम दिल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. चित्रपट बनवण्याचा आमचा हेतू पूर्णपणे शुद्ध होता. प्रेक्षकांचे मन आम्हाला तोडायचे नाही. आम्ही चित्रपट बनवला काळजी घेतली आहे की तो कुठूनही अश्लील वाटणार नाही. यात आम्ही वास्तवाविषयी बोललो आहोत, पण ते अगदी सुंदर आणि गोड पद्धतीने दाखवले आहे.

OMG 2 OTT Released
Gaurav More Share Post: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील सुपरस्टार गौरव मोरेची मोठी झेप; नव्या लूक मागचं कारण रिव्हील

अमित राय पुढे OTT वर 'OMG 2च्या रिलीजविषयी बोलताना म्हणले, 'आम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर मूळ चित्रपट प्रेक्षकांसाठी आणण्याचा निर्णय घेतला आहे. जो चित्रपट सेन्सॉर बोर्डाला दाखवायचा नव्हता. पण आता प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला आहे आणि त्यांची पसंती दर्शवली आहे. सेन्सॉर बोर्डाला काही कळत नसेल तर यावर काय बोलणार.

प्रत्येक चित्रपटाला त्याच्या थिएटरमध्ये रिलीजनंतर ओटीटीवर जाण्यासाठी 4 आठवडे वाट पाहावी लागते. त्यानंतरच हा चित्रपट कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. OTT वर 'OMG 2' च्या रिलीजच्या तारखेबाबत निर्मात्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी तो सप्टेंबरच्या अखेरीस जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार असल्याचे समजते तेही UNCUT.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com