Subhedar Review: तानाजी मालुसरे अन सुन्न करणारी शिवगर्जना... शिवअष्टक मालिकेतील 'सुभेदार' चित्रपट प्रदर्शित

Subhedar Movie Released: आज 'सुभेदार' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
Subhedar Movie Review
Subhedar Movie ReviewSaam TV
Published On

Marathi Movie Subhedar Released:

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवअष्टक या चित्रपटांच्या मालिकेतील पाचवा चित्रपट 'सुभेदार' प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन करण्यासोबतच दिग्पाल यांनी या चित्रपटामध्ये अभिनय देखील केला आहे. आज 'सुभेदार' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट आजवर प्रदर्शित झाले आहेत. कालांतराने शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या शौर्याची गाथा सांगाणारे चित्रपट आपल्या भेटीला येऊ लागले. त्यातील एक म्हणजे 'सुभेदार'.

Subhedar Movie Review
'OTT'वर Uncut प्रदर्शित होणार OMG 2; संतापलेल्या निर्मात्यांचा मोठा निर्णय

'सुभेदार'ची कथा

सुभेदार चित्रपटाचे लेखन स्वतः दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. सुभेदारची कथा तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित आहे. चित्रपटाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांविषयी जाणून घेण्यापासून होते. शिवाजी महाराज यांची मित्र तानाजी मालुसरे यांची पुन्हा भेट होते. त्यानंतर तानाजी यांचा चित्रपटातील प्रवास सुरू होतो.

तानाजी मालुसरे यांचा प्रवास आपल्याला माहीत आहे. या चित्रपटामध्ये यांचा सरदार ते सुभेदार हा प्रवास दाखविण्यात आला आहे. तसेच त्यांचे वेगवगेळे पैलू दाखविण्यात आले आहेत. (Latest Entertainment News)

Subhedar Movie Review
Gaurav More Share Post: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील सुपरस्टार गौरव मोरेची मोठी झेप; नव्या लूक मागचं कारण रिव्हील

चित्रपटाचा पुर्वार्ध

चित्रपटाच्या पूर्वार्धात अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तानाजी मालुसरे यांची ओळख, स्वराज्य स्थापन होण्यापूर्वी रयतेचे होणारे हाल, शिवाजी महाराज्यांच्या आग्राहून सुटका हे सगळं पूर्वार्धात दाखविण्यात आले आहे. मध्यंतरापर्यंत ही कथा खूप संथ जाते. मध्यंतरापर्यंत एकही लढाही तुम्हाला पाहायला मिळत नाही. पण अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसह मावळे देखील भावनिक झाल्याचे पाहायला मिळेल.

चित्रपटाचा उत्तरार्ध

सुभेदार चित्रपटाचा उत्तरार्धात आपल्याला कोंढाण्याच्या लढाईची तयारी पाहायला मिळते. अगदी तो गड का महत्त्वाचं आहे. त्यानंतर तो कसा जिंकायचा हे सर्व आपल्याला उत्तरार्धात दाखविण्यात आले आहे. रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी आलेले तानाजी मालुसरे, शेलार मामा आणि सुर्याजी गडावरील तयारी पाहून विचारात पडतात. (Movie)

उत्तराधार्थ सगळ्यात लक्ष्यवेधी ठरले ती कोंढाण्यावरील लढाई. तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्यातील लढाई खूपच रंजक आहे. ही कधी आपल्याला माहीत आहे. परंतु सुभेदारमधील ही थरारक झुंज पाहून अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी. १० मिनिटांच्या या लढाईत तुमची नजर स्क्रीनवरून हलणार नाही. तर लढाईतील अजय पुरकर यांची आरोळी सुन्न करून टाकतो.

या लढाईचे चित्रीकरण करताना दिग्दर्शकांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. Parkour / Freerunning style हे तंत्रज्ञान चित्रपटात वापरण्यात आले आहे. मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच अशा तंत्रज्ञानाचा वापरण्यात आला आहे. यामुळे ही लढाई खूप आकर्षक वाटते. याचसह चित्रपटातील संवाद देखील सुंदर लिहिले आहेत, जे वेळोवेळी आपल्याला भानावर आणतात.

कलाकार

आऊसाहेब- मृणाल कुलकर्णी, छत्रपती शिवाजी महाराज- चिन्मय मांडलेकर, सोयराबाई- नूपुर दैठणकर, तान्हाजी मालुसरे- अजय पूरकर, शेलार मामा- समीर धर्माधिकारी, सूर्याजी -अभिजीत श्वेतचंद्र, सावित्री- स्मिता शेवाळे, पार्वतीबाई- उमा सरदेश्मुख, रायबा- अर्णव पेंढरकर, यशोदा- शिवानी रांगोळे, येसाजी कंक - भूषण शिवतरे, मोरोपंत- श्रीकांत प्रभाकर, बाजी जेधे- बिपीन सुर्वे, जनागराडीण- अलका कुबल, शेलार- मा.राजदत्त, शेलार मुलगी- ऐश्वर्या शिधये, हिरोजी इंदुलकर- सौमित्र पोटे, पीलाजी नीळकंठ- संकेत ओक, बाजीपासलकर- सुनील जाधव, जानोजी- मंदार परळीकर, जीवा- विराजस कुलकर्णी, रंभाजी- अजिंक्य ननावरे, उदयभान- दिग्विजय रोहिदास, कुबादखान- रीषी सस्केना, अचलसिंह- ज्ञानेश वाडेकर, केसर- मृण्मयी देशपांडे, बहिर्जी नाईक- दिग्पाल लांजेकर, विश्वास- आस्ताद काळे, नवलाजी- पूर्णानंद वाडेकर या सर्व कलाकारांनी चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. (Celebrity)

चित्रपटातील लढाईची १० मिनिट पैसे वसूल आहेत. शिवाजी महाराज अनेक पैलू तसेच त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावणारे मावळे हे सगळं अनुभवण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com