Sara Ali Khan Birthday 
मनोरंजन बातम्या

Sara Ali Khan: 'या' गंभीर आजारामुळे सतत वाढत होतं वजन, अभिनेत्रीने कशी केली मात ?

Sara Ali Khan Fitness : सारा अली खान सैफची आणि अमृता सिंहची लाडकी लेक आहे. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधी सारा वजनामुळे तुफान ट्रोल व्हायची.

Chetan Bodke

अभिनेत्री सारा अली खान ही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. साराला आज कोणत्याही वेगळ्या प्रसिद्धीची आवश्यकता नाही. तिने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. आज सारा अली खानचा २९ वा वाढदिवस आहे. आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या विषयी जाणून घेऊया...

साराने आपल्या स्वभावाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला सारा हिचा स्वभाव आवडतो. साराचा जन्म १२ ऑगस्ट १९९५ रोजी झालेला आहे. साराही सैफची आणि अमृता सिंहची लाडकी लेक आहे. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधी सारा वजनामुळे तुफान ट्रोल व्हायची. साराचं बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी पीसीओडीमुळे सतत वजन वाढायचं. तिने एका मुलाखतीमध्ये, आजाराबद्दलचा खुलासा केला होता.

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी साराचं ९६ किलो वजन होतं. वजन इतकं वाढल्यामुळे तिला अभिनयक्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल की नाही ? कायमच ती या विचारात राहायची. वजन कमी करण्यासाठी अभिनेत्रीने विशेष मेहनत घेतली. वजन सतत वाढण्याचं कारण तिचं आजारपण होतं. पण तिने ज्यावेळी फिट होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तिने विशेष मेहनत घेत स्वत:ला स्लिम ट्रीम केलं. साराने ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूतही प्रमुख भूमिकेत होता.

सारा अली खान आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने फार कमी दिवसांत प्रेक्षकांचे मन जिंकले. साराने बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर अनेक फ्लॉप चित्रपट दिले. पण तरीही तिच्या लोकप्रियतेत कोणतीही कमी झाली नाही. सारा ४१ कोटींची मालकीण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला कोणत्या देवाचे पूजन करतात? आणि किती दिवे लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT