मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar on MHJ Set VIDEO : 'हास्यजत्रा' पुन्हा सज्ज, सईच्या इन्स्टा लाईव्हमध्ये प्रसाद ओकचा राऊडी लूक, प्राजूच्या व्हॅनिटीमध्ये शिरताच...

Maharashtrachi Jasya Jatra New Season : येत्या १४ ऑगस्टपासून नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : महाराष्ट्राला खळखळून हसवणारी मालिका ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १४ ऑगस्टपासून नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमेरिकेचा दौरा संपवून सर्वच कलाकार परतले असून नव्या दमाने प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज आहेत. हास्यजत्रेच्या नव्या सीजनच शूटिंगही सुरु झालं आहे.

हास्यजत्रेची जज अभिनेत्री सई ताम्हणकर हिने सेटवर पोहोचल्यानंतर पहिल्यांदा प्रेक्षकांशी संवाद साधला. इन्स्टाग्राम लाईव्ह येत हास्यजत्रेच्या सेटवर आल्याचं सईने सांगितलं. त्यानंतर तिने कार्यक्रमातील सर्वांशी एक-एक करुन संवाद साधला.

सईने सर्वात आधी जज प्रसाद ओकच्या व्हॅनिटी वॅनमध्ये जात सरप्राईज दिलं. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक आता नव्या लूकमध्ये हास्यजत्रेत आपल्याला दिसणार आहे. प्रसादचा मिशी वाढवलेला राऊडी लूक समोर आला आहे. यावेळी दोघांनी आम्ही तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाल्याचं सांगितलं. (Entertainment News)

त्यानंतर सई प्राजक्ता माळीच्या व्हॅनिटी वॅनमध्ये शिरली. यावेळी प्राजक्ता नेहमीप्रमाणे काही खात होती. मात्र ते फरसाण नव्हतं, हे सईने आवर्जून सांगितलं. यावेळी सईने प्राजक्ताचं तिच्या नवी फार्म हाऊससाठी अभिनंदनही केलं. प्राजूचं अत्यंत कौतुक आहे, असंही सईने म्हटलं. प्राजक्ता माळी पहिल्या एपिसोडमध्ये कोणता ड्रेस घालणार आहे, तोही सईने दाखवला.

त्यानंतर सई चेतना भट, प्रभाकर मोरे, अरुण कदम, प्रसाद खांडेकर, पृथ्वीक, नम्रता अशा सर्वांशी संवाद साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT